म्युच्युअल फंड विषयाला वाहून घेतलेल्या मराठी भाषेतील पहिल्याच संकेतस्थळावर आपले हार्दिक स्वागत असो.
या संकेतस्थळ निर्मीतीच्या उपक्रमाचा प्रमुख उद्देश जास्तीत जास्त मराठी माणसापर्यंत म्युच्युअल फंडाची सर्व माहिती तसेच गुंतवणूकीचे फायदे-तोटे, जोखिम, म्युच्युअल फंडाचे प्रकार व योजना यांची माहिती सोप्या मराठी भाषेत पोहचवीणे हा आहे.
तुमच्या गरजेप्रमाणे सर्वप्रकारच्या योजना म्युच्युअल फंडात असतात. समभाग आधारीत योजनेत शेअर बाजाराची जोखीम असते तर कर्ज रोखे आधारीत योजनेत शेअर बाजाराची जोखीम नसते. म्युच्युअल फंड योजनेत केलेल्या गुंतवणूकीचे व्यवस्थापन तज्ञ व्यक्ती करत असतात हा यातील सर्वात मोठा फायदा होय.
तुमच्या गरजेनुसार योजना निवडण्यासाठी खालीलपैकी ज्या प्रकारच्या योजनेत तुम्हाला गुंतवणूक करावयाची असेल त्या प्रकारावरील दुव्यावर क्लिक करा:
माहिती जास्तीत जास्त मराठी भाषीकांपर्यत पोहोचवीण्याच्या या उपक्रमात आपला सहभाग स्वागतार्ह आहे.
समभाग आधारीत योजना |
|
कमी जोखीमीच्या डेब्ट फंड योजना |
लार्ज कँप योजनाया प्रकारच्या योजनेत मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते |
|
लिक्वीड फंड योजनामनीमार्केटमध्ये गुंतवणूक करणा-या अल्प मुदतीसाठीच्या योजना. |
|
या प्रकारच्या योजनेत मध्यम व लहान आकाराच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते. तुलनात्मदृष्ट्या जास्त जोखीम असते. |
|
कमी जोखीमीच्या अल्प व मध्यम मुदतीसाठी. या योजनेतील गुंतवणूक कमाल १ वर्ष मुदतीच्या डेब्ट सिक्युरिटी मध्ये केली जाते. व्याज दर बदलाची जोखीम असते |
|
या प्रकारच्या योजनेत मोठ्या व मध्यम आकाराच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते. |
|
बँकेतील एफडीपेक्षा करपश्र्चात जास्त उत्पन्न देणा-या. बँक एफडी ला हा सर्वोत्तम पर्याय आहे. |
|
या प्रकारच्या डायव्हर्सिफाईड योजनेत मोठ्या, मध्यम व लहान आकाराच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते. |
|
सेव्हींग बँक खात्याला पर्यायी योजना सेव्हींग बँक खात्याप्रमाणे एटिएम कार्डाने कोणत्याही बँक एटिएम मधून केव्हाही पैसे काढण्याची सुवीधा असणारी जास्त परतावा देऊ शकणारी योजना. |
|
आयकर कलम 80-सी नुसार वजावटीला पात्र असणा-या योजना. ELSS योजना असेही याना म्हटले जाते. ३ वर्षे पैसे काढता येत नाहीत. कर बचतीसाठी सर्वोत्तम. |
|
पतसंस्था, क्रेडिट सोसायटी, सार्वजनीक ट्रस्ट, सहकारी गृहनिर्माण संस्था व उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती |
|
नांवाप्रमाणेच या प्रकारच्या योजनेत इक्वीटी व डेब्ट (कर्जरोखे व मनी मार्केट) मधील गुंतवणूकीचा समतोल साधला जातो. |
|
नियमीत उत्पन्न देणाचे उदिष्ठ व मर्यादीत जोखीम असणा-या हायब्रीड योजना. दिर्घ मुदतीच्या डेब्ट सिक्युरिटी मध्ये प्रामुख्याने व काही रक्कम शेअर बाजारात गुंतवली जाते. |
आपणास म्युच्युअल फंडाच्या कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्याची इच्छा असल्यास या संकेतस्थळावरुन ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष फॉर्म भरुन आपण गुंतवणूक करु शकता व या उपक्रमात सहभागी होऊ शकता. आम्ही जगातील कोणत्याही भागात इंटरनेटच्या माध्यमातून सेवा देऊ शकतो.
म्युच्युअल फंड योजनेत थेट (Online) गुंतवणूकीचे फायदे
तसेच गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला फिजीकल स्वरुपात फॉर्म हवे असल्यास Download विभागातून फॉर्म डाऊनलोड करुन घ्या अथवा आम्हाला संपर्क करा आम्ही संपुर्ण जगात कोठेही फॉर्म व त्यासोबत सुचना पत्रही कुरिअर अथवा पोष्टाने पाठवण्याची व्यवस्था करतो.