सरकारी क्षेत्रातील भारतीय आयुर्विमा महामंडळाने किमान ४.५ टक्के हमी उत्पन्न अर्थात 'मिनिमम गॅरण्टीड रिटर्न' असलेली 'युनिट लिंक्ड पेन्शन' योजना बाजारात आणली आहे. गुरुवारपासून गुंतवणूकदारांना उपलब्ध करण्यात आलेल्या या 'युलिप' स्कीमला कंपनीने 'पेन्शन प्लस' असे नाव दिले आहे.
सधनवर्गाच्या हातात आलेला अतिरिक्त पैसा आणि चारचाकी मोटारींच्या नवनव्या मॉडेल्सनी निर्माण केलेले आकर्षण यामुळे यंदा पावसाळ्यातही, गेल्या ऑगस्ट महिन्यात चारचाकी वाहनांच्या बाजारपेठेत उत्तम तेजी दिसून आली आहे.
आयुर्विमा पॉलिसीच्या दस्तावेजावर एक अत्यंत महत्त्वाची नोंद करणे आवश्यक आहे. ही नोंद म्हणजे पॉलिसीधारकाच्या वारसाचे नामनिर्देशन किंवा नॉमिनेशन.
इकॉनॉमिक टाइम्सच्या ब्रँड इक्विटी पाहणीत हवाई वाहतूक क्षेत्रात 'एअर इंडिया'ने देशातील सर्वांत अधिक विश्वासू ब्रँड म्हणून लौकिक संपादन केला आहे.
शेअर बाजारात गुरुवारी सट्टारूपी विक्रीचा जोर वाढला. त्यामुळे सौद्यांना आरंभ होताना १५० अंशांनी उंचावलेला सेन्सेक्स उतरत गेला आणि पुढे १८,२३८वर स्थिरावला. मागील बंदपेक्षा तो ३२ अंशांनी अधिक राहिला. एनएसईच्या निफ्टीत १४ अंशांनी वाढ होऊन तो ५४८६वर बंद झाला.
सरकारी क्षेत्रातील आयडीबीआय बँकेने चालू व बचत खात्यांवरील सर्व सेवा शुल्के रद्द करण्यात आल्याची घोषणा बुधवारी येथे केली. असे करणारी 'आयडीबीआय' ही देशातील पहिलीच बँक ठरली आहे.
प्रिमियम न भरल्यामुळे ठाणे विभागातील तब्बल १५ लाख पॉलिसी बुडाल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.
सोन्याच्या भावानेही मुंबईत १९ हजार रुपयांचा पल्ला पार केला. कित्येक दिवस दहा ग्रॅमचा भाव १८ हजार रुपयांच्या अलीकडे रेंगाळत राहिला होता. बुधवारी सकाळी सोन्याचा भाव १९ हजार १२५ रुपयांवर खुला झाला.
व्हिडिओकॉन मोबाइल सेवेद्वारे अमेरिका व कॅनडात प्रती सेकंद एक पैसा दराने मोबाइल फोन कॉल करणे शक्य झाले आहे.
सेन्सेक्स २३५ अंशांनी उसळला आणि तो पुन्हा १८ हजारांच्या पुढे जाऊन तो १८ हजार २०३वर स्थिरावला. एनएसईच्या निफ्टीत ६९ अंशांनी भर पडून तो ५४७२वर बंद झाला.
देशाची अर्थव्यवस्था विकासाचा (जीडीपी) दर जून अखेर संपलेल्या तिमाहीत ८.८ टक्के असा आकर्षक राहिला. मंदीचे सावट बाजूल सारत देशाने साधलेल्या उत्तम विकास दराबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
भारतीय स्टेट बँक 'फॉर्च्युन ५०० क्लब'मध्ये समाविष्ट झाली तरी बँकेचे अध्यक्ष ओम प्रकाश भट्ट आपल्या 'अत्यल्प' पगारामुळे दुःखी आहेत. 'फॉर्च्युन ५००'मधील सीईओला वर्षाला सरासरी ४७ कोटी रुपये मिळतात आणि आपल्याला २७ लाख रुपयेच मिळत आहेत, असे ते म्हणाले.
विमा कंपन्यांचे नियंत्रक इर्डाने घातलेल्या मार्गदर्शन सूत्रानुसार युलिप्स योजनेत बदल करण्यात आला असून ही नव्या स्वरूपातील योजना बुधवारपासून अमलात येत आहे.
भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) चालू आर्थिक वर्षात व्यक्तिगत पॉलिसीची संख्या एक कोटीपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने वाळवा तालुक्यातील पेठ येथील राजारामबापू सहकारी बँकेस संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षेत्र मंजूर केले आहे, असे बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांनी सांगितले.
शेअर बाजारात मंगळवारी पुन्हा विक्रीचा जोर राहिला. जीडीपी विकास दर तिमाहीत ८.८ टक्के असा समाधानकारक असल्याच्या वृत्ताकडे दुर्लक्ष करून विक्री करण्यात आली. ऑबेरॉय हॉटेलमध्ये मुकेश अंबानी समूह गुंतवणूक करणार असल्याच्या वृत्ताने रिलायन्स इंडस्ट्रीजला फटका बसला.
२०१२ पासून लागू होणा-या नवीन इन्कम टॅक्स एक्टने करदात्यांनो हुरळून जाऊ नका. नवीन कायद्यामुळे कराचा बोजा कमी होणार अशा वावड्या उठल्या होत्या, मात्र खरी परिस्थिती वेगळीच आहे. नवीन करप्रणालीनुसार, हाऊसिंग रेंट अलाउन्स घेतलेल्या पगारदार लोकांना अतिरिक्त कराचा बोजा भरावा लागणार आहे.
विकासकाने बुकिंग केलेल्या घराचा ताबा देण्यास विलंब केल्यास ते घर नाकारण्याचा हक्क ग्राहकास आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल राष्ट्रीय ग्राहक मंचाने नुकताच दिला.
जुनापुराणा प्राप्तिकर कायदा मोडीत काढणा-या प्रत्यक्ष कर कायद्याचे विधेयक सोमवारी केदीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी लोकसभेत मांडले. आता ते संसदेच्या छाननी समितीकडे पाठवण्यात आले असून त्यानंतर ते मंजूर होईल.
प्रत्यक्ष कर विधेयक सोमवारी लोकसभेत मांडले गेले असले तरी, कर सवलतीच्या मूळ आराखड्यात बदल करण्यात आल्याने सवलतींची मर्यादा कमी झाली असून दहा लाखांपर्यंतच्या उत्पन्न गटातील व्यक्तींना मिळणारा फायदा कमी झाला आहे. हे पाहता, प्रत्यक्ष कर प्रस्तावात केंद्राने चकवाच दिला.