व्हिडिओकॉन मोबाइल सेवेद्वारे अमेरिका व कॅनडात प्रती सेकंद एक पैसा दराने मोबाइल फोन कॉल करणे शक्य झाले आहे.
सेन्सेक्स २३५ अंशांनी उसळला आणि तो पुन्हा १८ हजारांच्या पुढे जाऊन तो १८ हजार २०३वर स्थिरावला. एनएसईच्या निफ्टीत ६९ अंशांनी भर पडून तो ५४७२वर बंद झाला.
देशाची अर्थव्यवस्था विकासाचा (जीडीपी) दर जून अखेर संपलेल्या तिमाहीत ८.८ टक्के असा आकर्षक राहिला. मंदीचे सावट बाजूल सारत देशाने साधलेल्या उत्तम विकास दराबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
भारतीय स्टेट बँक 'फॉर्च्युन ५०० क्लब'मध्ये समाविष्ट झाली तरी बँकेचे अध्यक्ष ओम प्रकाश भट्ट आपल्या 'अत्यल्प' पगारामुळे दुःखी आहेत. 'फॉर्च्युन ५००'मधील सीईओला वर्षाला सरासरी ४७ कोटी रुपये मिळतात आणि आपल्याला २७ लाख रुपयेच मिळत आहेत, असे ते म्हणाले.
विमा कंपन्यांचे नियंत्रक इर्डाने घातलेल्या मार्गदर्शन सूत्रानुसार युलिप्स योजनेत बदल करण्यात आला असून ही नव्या स्वरूपातील योजना बुधवारपासून अमलात येत आहे.
भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) चालू आर्थिक वर्षात व्यक्तिगत पॉलिसीची संख्या एक कोटीपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने वाळवा तालुक्यातील पेठ येथील राजारामबापू सहकारी बँकेस संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षेत्र मंजूर केले आहे, असे बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांनी सांगितले.
शेअर बाजारात मंगळवारी पुन्हा विक्रीचा जोर राहिला. जीडीपी विकास दर तिमाहीत ८.८ टक्के असा समाधानकारक असल्याच्या वृत्ताकडे दुर्लक्ष करून विक्री करण्यात आली. ऑबेरॉय हॉटेलमध्ये मुकेश अंबानी समूह गुंतवणूक करणार असल्याच्या वृत्ताने रिलायन्स इंडस्ट्रीजला फटका बसला.
२०१२ पासून लागू होणा-या नवीन इन्कम टॅक्स एक्टने करदात्यांनो हुरळून जाऊ नका. नवीन कायद्यामुळे कराचा बोजा कमी होणार अशा वावड्या उठल्या होत्या, मात्र खरी परिस्थिती वेगळीच आहे. नवीन करप्रणालीनुसार, हाऊसिंग रेंट अलाउन्स घेतलेल्या पगारदार लोकांना अतिरिक्त कराचा बोजा भरावा लागणार आहे.
विकासकाने बुकिंग केलेल्या घराचा ताबा देण्यास विलंब केल्यास ते घर नाकारण्याचा हक्क ग्राहकास आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल राष्ट्रीय ग्राहक मंचाने नुकताच दिला.
जुनापुराणा प्राप्तिकर कायदा मोडीत काढणा-या प्रत्यक्ष कर कायद्याचे विधेयक सोमवारी केदीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी लोकसभेत मांडले. आता ते संसदेच्या छाननी समितीकडे पाठवण्यात आले असून त्यानंतर ते मंजूर होईल.
प्रत्यक्ष कर विधेयक सोमवारी लोकसभेत मांडले गेले असले तरी, कर सवलतीच्या मूळ आराखड्यात बदल करण्यात आल्याने सवलतींची मर्यादा कमी झाली असून दहा लाखांपर्यंतच्या उत्पन्न गटातील व्यक्तींना मिळणारा फायदा कमी झाला आहे. हे पाहता, प्रत्यक्ष कर प्रस्तावात केंद्राने चकवाच दिला.
पॅनासोनिक इंडिया भारतात तीन वर्षाच्या काळात १४०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
सर्व प्रकारचे उत्पन्न मोजल्यानंतर एकूण रक्कम करपात्र मर्यादेपेक्षा कमी असल्यास इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची आवश्यकता नसते.
टाटा समूहातील इंडियन हॉटेल्स कंपनी, आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स समवेत कोल्हापूरमध्ये पंचतारांकित हॉटेल उभारणार आहे.
शेअर बाजारात सोमवारी आरंभी असलेले उत्साही वातावरण नंतर निवळले. लोकसभेत सादर करण्यात आलेल्या डायरेक्ट टॅक्स कोडमध्ये गुंतवणूकदारांना विशेष करसवलत मिळत नसल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यामुळे विक्रीचा जोर वाढला.
भारतात आयुविर्मा व्यवसायात तीव्र स्पर्धा निर्माण झालेली आहे. देशी-परदेशी अशा अनेक कंपन्या या व्यवसायात आल्या आहेत. त्यामुळे आयुविर्मा योजनांमध्ये कमालीचा बदल घडून आला आहे. प्रत्येक कंपन्या वेगवेगळ्या योजना जाहीर करीत आहेत.
आयएनजी लाइफ इंडिया कंपनीने मुलांसाठी 'आशीर्वाद' विमा योजना जाहीर केली आहे. ही योजना मुलांच्या भविष्यात येणाऱ्या महत्त्वपूर्ण प्रसंगी आईवडिलांना आथिर्क मदत करील तसेच मुलांच्या जीवनही सुरक्षित करील, असा दावा करण्यात आला आहे.
भारतातील पहिल्या खासगी रोजगार नियोजन केंदास स्वातंत्र्य दिनी सुरूवात करण्यात आली आहे. 'ई सोर्स इंडिया'ने युवकांच्या रोजगार गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने या उपक्रमास आरंभ केला आहे.