
रत्नागिरी जिल्ह्यातील व्यक्तीना
आमचेसोबत काम करुन नियमीत उत्पन्न मिळवण्याची उत्तम संधी.
अल्प व मध्यम मुदतीसाठी कर्जरोखे आधारीत (Debt Fund) योजना:
अशाप्रकारच्या योजनेतील गुंतवणूक हि बहुतांशी अल्प मुदतीच्या मनी मार्केट सिक्युरिटीमध्ये व थोडी रक्कम हि अल्प मुदतीच्या कर्जरोख्यात केली जाते. जेव्हा व्याजदरात वाढ होते तेव्हा अशा प्रकारच्या योजनेतून चांगले उत्पन्न मिळते. या योजनेत जोखीम जवळपास नसते. या प्रकारच्या योजनेत अगदी २/३ दिवस ते ६ महिने एवढ्या काळासाठी गुंतवणूक करणे योग्य होते. ज्याच्या बचत व चालू खात्यात जास्तीची रक्कम असते त्यानी या योजनेत अवश्य गुंतवणूक करावी. तसेच पतसंस्था, ट्रस्ट, सोसायटी, कंपन्या, व्यापारी ज्याच्या चालू खात्यात मोठी रक्कम शिल्लक असेल त्याप्रत्येक वेळी या योजनेत (लिक्वीड फंड) गुंतवणूक करुन जास्त उत्पन्न मिळवण्याची संधी घ्यावी. मोठी रक्कम असल्यास व ती जर दोन/किंवा तीन दिवस लागणार नसेल तर या पासून होणारा फायदा वगैरे माहिती जाणून घेण्यसाठी आमच्याशी संपर्क साधा. तसेच बचत खात्याला त्याच प्रकारच्या सुवीधेसह मिळणारा फायदा अधीक जादा उत्पन्न यासाठी रिलायन्स म्युच्युअल फंडाने एक नवीन सुवीधा सादर केली आहे. सेव्हींग बँक पर्याय येथे याची विस्तृत माहिती दिली आहे.
हे पान 31 Jan 2012 रोजीची कामगीरी दाखविणारे असून, प्रत्येक महिन्याचे अखेरीला आम्ही या पानावर अद्यावत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Debt Funds for Short to Medium Term – One Year Returns
|
Fund Name |
Launch Date |
NAV |
Returns % |
Invest Now |
Download |
|
Birla Sunlife short term opportunities |
June 08 |
12.12 |
9.80% |
||
|
DSBR Money Manager |
July 06 |
1445.07 |
8.63% |
||
|
Fidelity Ultra Short Term |
Sept 07 |
13.20 |
8.97% |
||
|
HDFC Short Term Opp. |
June 10 |
11.41 |
9.40% |
||
|
ICICI Ultra ST Prem |
June 09 |
11.69 |
8.66% |
||
|
Kotak Floater ST |
July 03 |
17.32 |
9.25% |
||
|
Reliance Money Manager |
Mar 07 |
1445.61 |
9.32% |
||
|
SBI InstaCash |
May 99 |
2344.69 |
8.87% |
||
|
TATA Floater |
Sept 05 |
15.85 |
9.39% |
||
|
UTI Money Market |
Apr 97 |
1185.36 |
9.17% |
गुंतवणूक करण्यासाठी मार्गदर्शन:
म्युच्युअल फंडाच्या कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्यासाठी केवायसी (Know Your Customer) करणे बंधनकारक आहे जर आपण प्रथमच गुंतवणूक करणार असाल तर प्रथमत: केवायसी करण्यासाठी KYC Application for Individuals हा फॉर्म आपल्या संगणकावर डाऊनलोड करुन त्याची प्रिंट काढून घ्या.
केवायसीसाठी लागणारी कागदपत्रे:
१) केवायसी फॉर्म (यावर प्रथमत: आपला फोटो चिकटवून, अर्धी सही बाहेर व अर्धी सही फोटोवर या प्रमाणे करा, दुसरी सही फॉर्मच्या खालच्या बाजूला सहीसाठी जागा आहे तेथे करावी).
२) पँन कार्डची प्रत त्यावर तुमची स्वाक्षरी करुन जोडावी.
३) रहाण्याच्या पत्त्याच्या पुराव्याची प्रत त्यावर तुमची स्वाक्षरी करुन जोडावी (रेशनकार्ड, वीज बील, टेलीफोन बील, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, ड्रायव्हींग लायसन्स, बँकेचे पासबुक – या पैकी कोणत्याही एकाची प्रत चालेल).
गुंतवणूकीसाठी लागणारी कागदपत्रे :
१) तुम्हाला वरीलपैकी ज्या योजनेत गुंतवणूक करावयाची असेल त्या योजनेसमोरील फॉर्म डाऊनलोड करुन त्याची प्रिंट काढून घ्या. फॉर्ममधील माहिती भरा. दुस-या पानावर पहिल्या गुंतवणूकदाराच्या सहीसाठी जागा आहे तेथे तुमची सही करा. गुंतवणूक जास्तीत जास्त तिघांच्या नांवाने करता येते, दोन किंवा तिन नांवाने गुंतवणूक करणार असाल तर तशा सह्या करा, तसेच प्रत्येकाची केवायसी करणे आवश्यक असते हे लक्षात ठेवा.
२) जर तुम्ही दरमहा नियमीत गुंतवणूक करणार असाल तर सोबतचा इसीएस / अँटो डेबीट फॉर्म भरा व त्यावर गुंतवणूकदारानी सह्या कराव्यात. बँकेत खाते ज्यांचे नांवाने असेल त्यानी बँक खात्याप्रमाणेच सही त्यासाठी असणा-या जागी करावी.
३) केवायसी झाल्याचा पुरावा अथवा वरीलप्रमाणे केवायसी फॉर्म व त्यासोबत लागणारी कागदपत्रेही जोडावी.
४) पँन कार्डची प्रत त्यावर तुमची (गुंतवणूकदाराची) सही करुन जोडावी.
५) ज्या रकमेची गुंतवणूक करावयाची असेल त्या रकमेचा चेक, ज्या योजनेत गुंतवणूक करावयाची असेल त्या योजनेच्या नांवाचा लिहून जोडावा.
६) नियमीत गुंतवणूकीसाठी (एसआयपी) दरमहा जेवढी गुंतवणूक करावयाची असेल तेवढ्या रकमेचा चेक ज्या योजनेत गुंतवणूक करावयाची असेल त्या योजनेच्या नांवाचा लिहून जोडावा.
वरीलप्रमाणे सर्व कागदपत्रे व फॉर्मस् आमचेकडे खालील पत्त्यावर पोष्टाने अथवा कुरीअरने रवाना करा, त्यापुढील सर्व कार्यवाही आम्ही करु.
ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस्
श्रीदत्त कृपा, बँक ऑफ इंडियासमोर, काविळतळी, चिपळूण-४१५६०५, जिल्हा: रत्नागिरी.
तुम्हाला आमच्याकडून कोणतीही मदत हवी असल्यास मला संपर्क करा मोबाईल क्र. 9422430302 किंवा इमेल करा sadanand.thakur@gmail.com