जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार

सहभागी व्हा

Who's new

  • badveprasad2005
  • brian500
  • थत्ते श्रीकांत

Who's online

There are currently 0 users and 1 guest online.

जाहीरात

आरोग्यं धनसंपदा

प्रतीबंधात्मक आरोग्य तपासणी

बाबत जाणून घेण्यासाठी

येथे टिचकी मारा

आपले कडून अपेक्षा व आभार

आपल्याकडून अपेक्षा:

आम्ही स्वत:च हे संकेतस्थळ ड्रुपलचे सहाय्याने (By using Content Management System provided by www.drupal.org ) बनविले असुन नियमित अपडेटही आम्हीच करतो कारण व्यावसाईकाकडून करुन घेण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो आणि संकेतस्थळ बनविण्याची आमची माहिती हि प्राथमिक स्वरुपाचीच असल्यामुळे आम्हाला हे काही फार आकर्षक स्वरुपात बनविता आलेले नाही.  हे संकेतस्थळ बनविताना व नियमित माहितीचे अपडेट ठेवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर वेळ व पैसा खर्च करावा लागला व दर महा करावा लागत आहे यास्तव आपणास इच्छा असल्यास खालील बाबी करुन आपण आम्हाला सहकार्य करुन या प्रोजेक्टमध्ये सहभागी होवू शकता, जेणे करून या संकेतस्थळाचा उपयोग अनेक जिज्ञासूना गुंतवणूक विषयक माहितीसाठी होवू शकेल.

आपण या प्रोजेक्टमध्ये सहभागी होण्यासाठी हे अवश्य करू शकता:

१)      आपण आमचे मार्फत गुंतवणूक करुन.

२)     आपले परिचीताना आमचे मार्फत गुंतवणूक करण्यास सांगून.

३)     ह्या संकेतस्थळाची माहिती आपले मित्र, मैत्रीणी, नातेवाईक व परिचीताना ईमेलद्वारा व अन्यप्रकारेसुध्दा कळवून हे संकेतस्थळ लोकप्रिय करण्यास हातभार लावून.

४)     या संकेतस्थळावर आपणास आवडलेले कोणतेही पान ईमेलद्वारे पाठवण्याची सुविधा ठेवली आहे तीचा वापर करुन.

५)    आपले अमराठी मित्राना आमची इंग्रजीमधील संकेतस्थळ www.noentryloadmutualfund.com कळवून.

६)      आम्हाला प्रोत्साहनपर ईमेल पाठवून - sadanand.thakur@gmail.com


आभार:

हे संकेतस्थळ बनविताना संदर्भासाठी आम्हाला www.mutualfundsindia.com www.valueresearchonline.comwww.amfiindia.com या म्युच्युअल फंड विषयक संकेतस्थळांचा, Association of Mutual Funds of India (AMFI) ची म्युच्युअल फंड वितरक बनताना जी अँफीची परिक्षा आम्हाला द्यावी लागली त्या परिक्षेच्या तयारीसाठी जे पुस्तक अँफीने आम्हाला उपलब्ध करून दिले होते त्या पुस्तकाचा संदर्भासाठी व माहिती संकलन व सुसुत्रीकरणासाठी उपयोग झाला तसेच www.marathiwebsites.com चे मालक श्री. प्रसाद शिरगांवकर यांचे आम्हाला बहुमोल सहकार्य झाले त्या सर्वाना मन:पुर्वक धन्यवाद.  तसेच धनवृध्दीसाठी म्युच्युअल फंड, या पुस्तकाचे लेखक श्री. अरविंद शं. परांजपे यांनी त्यांचे या पुसत्कातील माहितीचा वापर संदर्भ म्हणून या संकेतस्थळावर वापरण्यास परवानगी दिल्याबद्दल त्यांचेही आभार. (भविष्यात माहितीचा खजिना मध्ये वाढीव माहिती देताना आम्ही या पुस्तकातील संदर्भ वापरणार आहोत).

त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीनी या संकेतस्थळामाध्यमातून आमचेमार्फत गुंतवणूक करुन आमचेवर जो विश्वास दाखवला त्या सर्वांचे मनस्वी शतश: आभार.  तसेच ज्या व्यक्ती या संकेतस्थळामार्फत यापुढे गुंतवणूक करुन हा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी हातभार लावतील त्यांचेही आभार.