
रत्नागिरी जिल्ह्यातील व्यक्तीना
आमचेसोबत काम करुन नियमीत उत्पन्न मिळवण्याची उत्तम संधी.
विमा प्रतिनीधी बनून नियमीत उत्पन्न मिळवण्याची उत्तम संधी.

आम्ही इंडिया फर्स्ट लाइफ इंशुरन्स ( joint venture of Bank of Baroda, Andhra Bank and Legal & General) कंपनीसाठी डिएमए (डिव्हिजनल मार्केटींग असोसिएट) म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात काम करावयास सुरुवात केली आहे. या कंपनीची वैयक्तीक व्यक्तीसाठी उपयुक्त असणारी अनेक विमा उत्पादने आहेत.
ह्या कंपनीची जीवन विम्याची विवीध प्रकारची उत्पादने असून त्यात काही उत्पादने जशी कि टर्म इंशुरन्स, मनी बँक, एडाउनमेंट वगैर पारंपारीक योजना, युलीप इ. वैयक्तीक स्वरुपाची आहेत. हि उत्पादने तर सर्वच विमा कंपन्या विकत असतात.
परंतू या कंपनीचे वेगळे वैसिष्ठ सांगावयाचे झाल्यास या कंपनीने संस्थात्मक ग्राहकाना उपयुक्त व परवडणारी अशी विमा उत्पादने बाजारात आणलेली आहेत, अशी उत्पादने अन्य विमा कंपन्यांकडे सुध्दा उपलब्द असतात मात्र या कंपनी व्यतरिक्त बाकी सा-या विमा कंपन्या हि उत्पादने त्यांच्या या कामासाठी नेमलेल्या कर्मचा-यांमार्फतच विकत असतात. परंतु या कंपनीने हिच उत्पादने विमा प्रतिनीधीच्या मार्फत विकण्याची सुवीधा उपलब्ध करुन दिलेली आहेत हेच प्रमुख वेगळेपण या कंपनीचे आहे. हि उत्पादने सहकारी बँका, पतसंस्था, दुध डेअरी, खाजगी कंपन्या, बिल्डर आदी संस्थासाठी उपयुक्त आहेत, जी विमा प्रतिनीधी विकू शकतात. कंपनीची अश्या प्रकारची तिन उत्पादने आहेत. आता आपण या उत्पादनांची उपयक्तता व त्यांचा उपयोग व्यवसायासाठी कसा होऊ शकतो हे पाहुया.
१) गृप टर्म लाईफ इंशुरन्स: या विमा योजनेव्दारे एखाद्या आस्थापनातील ५० किंवा अधिक व्यक्तींचा एकत्रीतपणे विमा उतरवला जातो. यासाठी किमान ५० व्यक्तींचा समुह असावा लागतो. समुहाच्या जास्तीत जास्त आकाराला कोणतीही मर्यादा नाही. या विम्यासाठी होणारा एकूण हप्ता हा समुहाचा आकार, समुहाचे सरासरी वय व गेल्या काही वर्षातील मृत्यु्दर यावर ठरवला जातो. होणारा एकूण हप्ता हा बराच मोठा होत असतो मात्र समुहातील प्रती व्यक्ती मागे होणारी रक्कम हि अगदी नगण्यच असते. संस्था हा हप्ता आस्थापनाचा खर्च म्हणून दाखवू शकतात अथवा काही संस्था हि रक्कम समुहातील व्यक्ती कडून वसुल करतात त्यामुळे संस्थेवर कोणताही भार येत नाही. मात्र येणारा एकूण हप्ता मोठा होत असल्याने व विमा प्रतिनीधीला मिळणारे कमिशन हे विमा हप्त्यावर अवलंबून असल्यामुळे विमा प्रतिनीधीला मिळणा-या कमिशनची रक्कमही मोठी होते. आता आपण यासाठी एक काल्पनीक उदाहरण पाहुया. समजा एक मध्यम आकाराची पतसंस्था असून तिचे २००० सभासद आहेत व त्या सदस्यांसाठी त्या संस्थेला समुह विमा घ्यावयाचा आहे जो सरासरी प्रती सभासद रु.दोन लाखाचा हवा आहे. आता असे पहा कि जर प्रती व्यक्ती प्रती लाख रु.१०००/- वार्षीक हप्ता होत असेल तर २००० व्यक्तींच्या समुहाच्या एकूण वार्षीक हप्ता होतो रु.२० लाख (२००० गुणीले १०००). तुम्हाला मिळणारे कमिशन याच एकूण हप्त्यावर मिळते. एकूण हप्ता जरी मोठा होत असला तरी प्रती व्यक्ती येणारी रक्कम फारच कमी होते व ती पतसंस्था आपल्या सभासदांकडूनच वसूल करुन भरत असल्याने संस्थेवरही कोणताच भार येत नाही. काही प्रकारचे संस्थात्मक ग्राहक हा खर्च आस्थापनाचा म्हणून करतात, जी व्हँल्य अँडेड सेवा समजली जाते व आकर्षण म्हणून दिली जाते.
२) गृप क्रेडिट लाइफ: सहकारी बँका/पतसंस्था या त्यांचे सभासदाना वेगवेगळ्या प्रकारची कर्जे देत असतात व ज्यांची मुदत ५ ते १५ वर्षे, कर्जाच्या प्रकारावर अवलंबून असू शकते. जर या कर्जाच्या कालावधीच्या व कर्ज खात्यात बाकी असताना जर कर्जदाराचा मृत्यु झाला तर सहकारी बँका/पतसंस्थेला हि कर्ज बाकी कर्जदाराचे वारसाकडून अथवा त्याच्या जामीनदाराकडून वसूल करावी लागते. हि प्रक्रिया फार खर्चीक व वेळ काढू असते. हे टाळण्यासाठी गृप क्रेडिट लाइफ हा विमा उपयोगी असतो. ह्या विम्याचा हप्ता एकदाच भरावा लागतो व सहकारी बँका/पतसंस्था कर्जदाराच्या खाती रक्कम नांवे टाकून या विम्याच्या हप्त्याची रक्कम भरु शकते. हा विमा घेतलेला असल्यास जर कर्जदाराचा म्युत्यु मुदती दरम्याने झाला तर विमा कंपनी विम्याची संपुर्ण रक्कम सहकारी बँका/पतसंस्थेला देत यातून कर्जाची बाकी रक्कम वसुल करुन घेऊन उर्वरीत रक्कम कर्जदाराचे वारसाला दिली जाते या मुळे सहकारी बँका/पतसंस्थेचा कर्ज वसूलीचा त्रास तर वाचतोच व कर्जदाराच्या वारसाला काहि रक्कम मिळाल्याने थोडा आर्थिक दिलासाही मिळतो. या विम्याचा हप्ताही फारच कमी येत असल्याने सहकारी बँका/पतसंस्था व कर्जदार या दोघांसाठीही लाभदायक होतो. एजंटसाठी होणा-या एकूण विमा हप्त्याची रक्कम मोठी होत असल्याने चांगले कमिशन मिळतेच व सहकारी बँका/पतसंस्था या नियमीतपणेच कर्ज वाटप करत असल्यामुळे नियमीत धंदाही एजंटसाठी होतो.
३) एम्प्लॉयी बेनीफिट प्लान: ह्या योजनेधारे कर्मचा-याना भविष्यात द्याव्या लागणा-या ग्रँज्युइटी, शिल्लक रजा पगार याची रक्कम वार्षीक हप्ता स्वरुपात या योजनेत गुंतवली जाते. तसेच या कर्मचा-याना गृप टर्म इंशुरन्सचाही फायदा दिला जातो. हा सुध्दा एक फायदेशीर प्लान संस्थेला व एजंटसाठी होत असतो.
आता थोडेसे प्रयत्न करुन अशा संस्थात्मक ग्राहकांशी संपर्क साधून त्याना हि उत्पादने विकून तुम्ही चांगले कमिशन मिळवू शकता. संपुर्ण महाराष्ट्रात काही शेकडा सहकारी बँका आहेत तर काही हजार पतसंस्था आहेत. या व्यतरीक्त अनेक बिल्डर, दुध डेअरी, सरकारी कार्यालये, कंपन्या अशानाही हि उत्पादने विकता येतात.
म्हणजेच एखादी संस्था तुम्ही तुमची ग्राहक करु शकलात तर तुम्ही त्याना तीन महत्वाची विमा उत्पादने विकून दर वर्षीच अतिशय चांगले कमिशन मिळवू शकता. आणि अशा १० ते १५ संस्था जर का तुम्ही तुमच्या ग्राहक केल्यात तर दर वर्षीच तुम्हाला चांगले उत्पन्न मिळत राहील. तुम्हाला करावयाचे आहे ते एवढेच कि अशा काही संस्थाना भेटून ह्या उत्पादनांची माहिती देऊन त्यांची अपॉइंटमेंट घ्यावयाची त्यानंतर मी किंवा इंडियाफर्स्ट कंपनीचा प्रतिनीधी तुमच्यासोबत येऊन माहिती देईल आवश्यक ते उत्पादन विकले जाईल तुम्हाला चांगले कमिशन मिळेल. त्यानंतर तुम्ही त्या संस्थेला नियमीत व चांगली सेवा देत रहा म्हणजे तो ग्राहक तुमचा कायमचा होऊन जाईल. दर महिन्यात अशी एखादी संस्था ग्राहक म्हणून जोडणे तुम्ही मेहनत केल्यास सहज शक्य आहे. या बाबत सर्व माहिती मी तुम्हाला तुम्ही मला संपर्क केल्यावार सविस्तरपणे देईनच. आणि म्हणूनच योग्य व मेहनती व्यक्ती दरमहा रु.१,००,०००/- पेक्षा जास्त उत्पन्न मिळवू शकतात. आम्ही संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात आपणास ट्रेनींग व विक्रिसाठी व्यक्तीगतरित्या सर्वतोपरी सहकार्य करु. हा व्यवसाय करण्यासाठी किमान १२ वी पास असणे आवश्यक आहे. परत तुमच्या सोइनुसार तुम्ही काम करु शकता, थोडक्यात तुम्हीच तुमचे बॉस होता. हा व्यवसाय तुम्ही कितीही वाढवू शकता. मी डिएमए म्हणून इंडियाफर्स्ट लाइफ इंशुरन्सकरीता एजंट नेमतो, त्याना प्रशिक्षण देतो, व्रिक्रीसाठी मदत करतो.
जर का आपण या कंपनीसोबत विमा प्रतिनीधी म्हणून काम करु इच्छित असाला तर कृपया sadanand.thakur@gmail.com येथे इमेल करा. अथवा ९४२२४३०३०२ वर संपर्क करा. मी स्वत: अथवा आमचा प्रतिनीधी आपणाशी संपर्क करेल. रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या आपल्या मित्राना काम करुन पैसे मिळविण्याची इच्छा असेल त्याना हि माहिती अवश्या द्या.