
रत्नागिरी जिल्ह्यातील व्यक्तीना
आमचेसोबत काम करुन नियमीत उत्पन्न मिळवण्याची उत्तम संधी.
ऑनलाईन गुंतवणूक कशी करावी?
नवीन गुंतवणूकदारांसाठी माहिती:
१) जर तुम्ही प्रथमच म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणार असाल तर तुम्ही युटीआय, रिलायन्स, आयसीआयसीआय किंवा फिडेलटी यापैकी कोणत्याही म्युच्युअल फंडाच्या योजनेत गुंतवणूक करु शकता.
२) आता तुम्हाला हव्या त्या म्युच्युअल फंडाच्या (डाव्या बाजूच्या) लोगोवर क्लिक करा.
३) New Investor साठी असलेल्या टँबवर क्लिक करा.
४) पैसे भरण्याचा पर्याय निवडा.
५) योजना निवडा.
६) फॉर्म मध्ये माहिती भरा.
७) ऑनलाईन अँसेसच्या रेडिओ बटणावर क्लिक करा (तुम्हाला पुढिल व्यवहारांसाठी पिन मिळेल).
८) नेट बँकींगचा पर्याय निवडलेला असेल तर पैसे ट्रान्सफर करा.
९) फॉर्मची प्रिंट काढा. सही/सह्या करा.
१०) केवायसी फॉर्मची प्रिंट काढा, त्यावर फोटो चिकटवा, सही/सह्या करा, सोबत पँन कार्डची प्रत व रहाण्याच्या पत्त्याची प्रत तुमच्या बँक मँनेजर कडून अटेस्टेड करुन घेऊन जोडा.
११) चेकचा पर्याय निवडलेला असल्यास योजनेच्या नांवाचा चेक गुंतवणूकीसाठी जोडा.
१२) वरील कागदपत्रे म्युच्युअल फंड कंपनीच्या कोणत्याही ऑफिसमध्ये पोस्टाने, कुरीअरने अथवा स्वत: नेऊन पोहोच करा, अथवा आमच्याकडे खालील पत्त्यावर पाठवा:
ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस्
श्रीदत्त कृपा, बँक ऑफ इंडियासमोर, काविळतळी, चिपळूण-४१५६०५, जिल्हा: रत्नागिरी.
अथवा प्रथम आमचे मार्फत प्रत्यक्ष गुंतवणूक करा, त्यानंर केव्हाही ऑनलाईन गुंतवणूक करणे सोईचे होईल.
ज्यानी यापुर्वी म्युच्युअल फंडात गुंतवणूक केलेली असेल त्यांचेसाठी:
म्युच्युअल फंडाच्या योजनेत ऑनलाईन गुंतवणूक करण्यासाठी डाव्या किंवा उजव्या बाजूला असणा-या बँनरमधील हव्या त्या म्युच्युअल फंड कंपनीच्या लोगोवर क्लिक करा.
१) तुमचा फोलीओ नंबर भरा.
२) बँक खाते नंबर लिहा
३) पँन नंबर लिहा.
४) फॉर्म भरा.
५) पैसे ट्रान्सफर करा.
६) तुमची गुंतवणूक पुर्ण झाली.