जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार

कर बचतीसाठी म्युच्युअल फंड योजना

आयकर कलम ८० सी खाली कर बचतीसाठी म्युच्युअल फंड योजना

म्युच्युअल फंडाचे Equity Link Savings Schemes (ELSS) अंतर्गत योजनेत गुंतवणूक (रु.एक लाख पर्यंत) केली असता ती आयकर कलम ८० सी खाली उत्पन्नातून वजावटीस पात्र असते ज्याद्वारे रु.३०,९००/- पर्यंत कर बचत करता येऊ शकते.

ह्या योजनेतील गुंतवणूक हि कंपन्यांचे समभागात दिर्घ मुदतीचे उद्देशाने गुंतवली जाते जेणेकरुन शेअर बाजाराचा दिर्घ मुदतीचे गुंतवणूकीमुळे संपत्ती निर्माण करण्याचे क्षमतेचा लाभही मिळू शकतो.  या योजनेत केलेली गुंतवणूक हि ३ वर्षे काढता येत नाही.  तीन वर्षानंतर केव्हाही संपूर्ण किंवा आवश्यक तेवढी रक्कम काढण्याची सुविधा असते व अशी काढलेली रक्कम हि पुर्णता करमुक्त असते.