जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार

Online Investment

खालील म्युच्युअल फंडात नवीन व्यक्ती तसेच ज्यानी या पुर्वी  या फंडात गुंतवणूक केलेली आहे अशा कोणत्याही व्यक्ती ऑनलाईन गुंतवणूक करु शकतात.






 

सहभागी व्हा

Who's new

  • विकास पै
  • HARIBHAUGAVIT
  • vikaswagh999

Who's online

There are currently 0 users and 1 guest online.

Forward

Logo

रत्नागिरी जिल्ह्यातील व्यक्तीना 

आमचेसोबत काम करुन नियमीत उत्पन्न मिळवण्याची उत्तम  संधी.

कर बचतीसाठी योजना

कर बचतीसाठी गुंतवणूक योजना योजनेच्या सुरुवातीपासूनची कामगिरी

या प्रकारच्या योजनेतील गुंतवणूकीवर आयकर कलम ८०-सी नुसार सवलत मिळते, म्हणून कर बचतीसाठी अशा योजनेत सर्वच करदात्यानी गुंतवणूक करावी. अशा प्रकारच्या योजनेत केलेली गुंतवणूक किमान तीन वर्षे काढता येत नाही. या योजनेतील पैसे मोठ्या व मध्यम आकाराच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रामुख्याने गुंतवले जातात. गेल्या १५-२० वर्षात अशा योजनेत केलेल्या गुंतवणूकीवर दिर्घ मुदतीत उत्तम परतावा मिळाल्याचे दिसते. बाजाराबाबत भाकीत करणे अवघड असते मात्र अशा प्रकारच्या योजनेत नियमीत दरमहा (एसआयपीव्दारे) गुंतवणूक करत राहिल्याने बाजारातील तेजी मंदीवर मात करुन भरघोस उत्पन्न मिळवता येऊ शकते. अशा गुंतवणूकीसाठी तुमचे उदिष्ठ जोपर्यंत तुमचे उत्पन्न करपात्र असते तोपर्यत करत रहाण्याचे असावे. बाजाराच्या कोणत्याही स्थितीमध्ये एसआयपी गुंतवणूक सुरु करावी. अशाप्रकारच्या योजनेत गुंतवणूक करताना शक्यतो देय लाभांश (Dividend Payout) हा पर्याय निवडावा कारण अशा योजनेत बहुतांशी दरवर्षीच लाभांश दिला जातो. म्युच्युअल फंडाच्या कोणत्याही योजनेतून मिळणारा लाभांश हा करमुक्त असतो. दरवर्षी लाभांशाचे नियमीत उत्पन्न मिळत राहील्याने ते पैसे तुम्ही कोणत्याही कारणासाठी वापरू शकता. नियमीत गुंतवणूक केल्यामुळे दिर्घ मुदतीत तुम्ही गुंतवलेली रक्कम व तिचे बाजार मुल्यही चांगले वाढते व नियमीत उत्पन्नही वाढत जाते. वीस वर्षे दरवर्षी ज्यानी कलम ८०-सी अंतर्गत सवलतीसाठी या योजनेत गुंतवणूक केलेली आहे त्याना सध्या दरवर्षी काही लाख रुपये लाभांशाचेच मिळत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. नियमीत लाभांश मिळूनही भांडवली मुल्यवृध्दी कशी होते हे समजण्यासाठी आम्ही मुद्दाम येथे देय लाभांश (Dividend Payout) या पर्यायाची मागिल कामगिरी दाखवली आहे. ज्या योजनांना १० वर्षाहून अधीक काळ झालेला आहे अशा योजनेतून मिळालेला एकूण लाभांश हा सध्याच्या गुंतवणूक मुल्याच्या सरासरी दुपटीपेक्षाही अधीक गुंतवणूकदाराना या पुर्वी मिळालेला असून मुद्दलातही भरिव वाढ झाल्याचे दिसत आहे.  देय लाभांश (Dividend Payout)  हा पर्याय नियमीत उत्पन्नासाठी तुम्ही म्युच्युअल फंडाच्या कोणत्याही योजनेसाठी वापरु शकता. तुम्ही ऑनलाईन गुंतवणूक करु इच्छीत असल्यास योजनेसमोरील Invest Online या लिंकवर क्लीक करा व जर तुम्ही प्रथमच गुंतवणूक करत असाल तर शक्यतो Download Form वर क्लीक करुन फॉर्म डाऊनलोड करा व याच पानावर दिलेल्या सुचनांचे पालन करा.

ह्या पानावरील माहिती 31 Jan 2012 पर्यंतची असून किमान दर महिना अखेरीला ती अद्यावत करण्याचा आमचा प्रयत्न राहील.

Tax Saving (ELSS) Funds(Dividend Payout option) – Performance since launch

Fund Name

Launch Date

NAV

Absolute

Returns in % for SIP

Value of SIP of Rs.5000/- p.m., since date of launch

In Rs.

Value of Rs.1 Lacs invested on date of launch

Invest Now

Download

Birla SL Tax Relief 96

Mar 96

9.64

8.47%

2,54,907

96,400

Invest Online 

Download Form 

DSPBR Tax Saver

Dec 06

15

17.22%

3,57,524

1,50,000

Invest Online

Download Form

Fidelity Tax Advantage

Jan 06

20.47

39.27%

4,94,419

2,04,700

Invest Online

Download Form

HDFC Tax Saver

Mar 96

212.54

673.68%

72,72,551

21,25,400

Invest Online

Download Form

ICICI Pru Tax Plan

Aug 99

130.73

373.85%

35,53,902

13,07,300

Invest Online

Download Form

Kotak Tax Saver

Oct 05

16.59

15.33%

4,32,486

1,65,900

Invest Online

Download Form

Reliance Tax Saver

Aug 05

19.48

32.96%

5,11,900

1,94,800

Invest Online

Download Form

SBI Magnum Tax Gain

Mar 93

55.29

196.05%

32,71,332

5,52,900

Invest Online

Download Form

TATA Tax Saving - Div

Mar 96

41.81

131.59%

21,65,339

4,18,100

Invest Online

Download Form

UTI Tax Savings

Dec 99

36.05

104.04%

14,79,281

3,60,500

Invest Online

Download Form

         The above figures are ex-dividend. All the above schemes have declared and paid dividend every year since inception.

गुंतवणूक करण्यासाठी मार्गदर्शन:

म्युच्युअल फंडाच्या कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्यासाठी केवायसी (Know Your Customer) करणे बंधनकारक आहे जर आपण प्रथमच गुंतवणूक करणार असाल तर प्रथमत: केवायसी करण्यासाठी KYC Application for Individuals हा फॉर्म आपल्या संगणकावर डाऊनलोड करुन त्याची प्रिंट काढून घ्या.

केवायसीसाठी लागणारी कागदपत्रे:

१)        केवायसी फॉर्म (यावर प्रथमत: आपला फोटो चिकटवून, अर्धी सही बाहेर व अर्धी सही फोटोवर या प्रमाणे करा, दुसरी सही फॉर्मच्या खालच्या बाजूला सहीसाठी जागा आहे तेथे करावी).

२)        पँन कार्डची प्रत त्यावर तुमची स्वाक्षरी करुन जोडावी.

३)        रहाण्याच्या पत्त्याच्या पुराव्याची प्रत त्यावर तुमची स्वाक्षरी करुन जोडावी (रेशनकार्ड, वीज बील, टेलीफोन बील, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, ड्रायव्हींग लायसन्स, बँकेचे पासबुक – या पैकी कोणत्याही एकाची प्रत चालेल).

गुंतवणूकीसाठी लागणारी कागदपत्रे :

१)        तुम्हाला वरीलपैकी ज्या योजनेत गुंतवणूक करावयाची असेल त्या योजनेसमोरील फॉर्म डाऊनलोड करुन त्याची प्रिंट काढून घ्या. फॉर्ममधील माहिती भरा. दुस-या पानावर पहिल्या गुंतवणूकदाराच्या सहीसाठी जागा आहे तेथे तुमची सही करा. गुंतवणूक जास्तीत जास्त तिघांच्या नांवाने करता येते, दोन किंवा तिन नांवाने गुंतवणूक करणार असाल तर तशा सह्या करा, तसेच प्रत्येकाची केवायसी करणे आवश्यक असते हे लक्षात ठेवा.

२)        जर तुम्ही दरमहा नियमीत गुंतवणूक करणार असाल तर सोबतचा इसीएस / अँटो डेबीट फॉर्म भरा व त्यावर गुंतवणूकदारानी सह्या कराव्यात. बँकेत खाते ज्यांचे नांवाने असेल त्यानी बँक खात्याप्रमाणेच सही त्यासाठी असणा-या जागी करावी.

३)        केवायसी झाल्याचा पुरावा अथवा वरीलप्रमाणे केवायसी फॉर्म व त्यासोबत लागणारी कागदपत्रेही जोडावी.

४)        पँन कार्डची प्रत त्यावर तुमची (गुंतवणूकदाराची) सही करुन जोडावी.

५)        ज्या रकमेची गुंतवणूक करावयाची असेल त्या रकमेचा चेक, ज्या योजनेत गुंतवणूक करावयाची असेल त्या योजनेच्या नांवाचा लिहून जोडावा.

६)        नियमीत गुंतवणूकीसाठी (एसआयपी) दरमहा जेवढी गुंतवणूक करावयाची असेल तेवढ्या रकमेचा चेक ज्या योजनेत गुंतवणूक करावयाची असेल त्या योजनेच्या नांवाचा लिहून जोडावा.

वरीलप्रमाणे सर्व कागदपत्रे व फॉर्मस् आमचेकडे खालील पत्त्यावर पोष्टाने अथवा कुरीअरने रवाना करा, त्यापुढील सर्व कार्यवाही आम्ही करु.

ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस्

श्रीदत्त कृपा, बँक ऑफ इंडियासमोर, काविळतळी, चिपळूण-४१५६०५, जिल्हा: रत्नागिरी.

तुम्हाला आमच्याकडून कोणतीही मदत हवी असल्यास मला संपर्क करा मोबाईल क्र. 9422430302 किंवा इमेल करा sadanand.thakur@gmail.com

 

Invest Online

खालील म्युच्युअल फंडात यापुर्वी गुंतवणूक केलेल्या व्यक्ती, ज्यांचा फोलीओ नंबर आहे व केवायसी झालेली आहे फक्त अशाच व्यक्ती ऑनलाईन गुंतवणूक करु शकतात, पीन नसली तरी चालेल.
 
 

 



 
 

 

टंकलेखकाची लिपी / भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...