जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार

Online Investment

खालील म्युच्युअल फंडात नवीन व्यक्ती तसेच ज्यानी या पुर्वी  या फंडात गुंतवणूक केलेली आहे अशा कोणत्याही व्यक्ती ऑनलाईन गुंतवणूक करु शकतात.






 

सहभागी व्हा

Who's new

  • प्रथमेश पार्सेकर
  • मदन सितारम रेनगदे
  • वैशाली म धुमालळ

Who's online

There are currently 0 users and 1 guest online.

Forward

शेअर बाजारातून पैसे मिळवण्याची कला 
जाणून घेण्यासाठी व्यनी पाठवा. 

गुंतवणूकीचे साधे नियम

गुंतवणूकीचे साधे नियम 

गुंतवणूक म्हटल म्हणजे काही तरी किचकट प्रकार आहे असा समज आपण उगाचच करुन घेतो. साधे व सोपे नियम पाळले तर हिच गोष्ट फारच सोपी आहे हे समजून येईल. साधी गोष्ट हि आहे कि गुंतवणूकीचे साधे व सोपे नियम पाळून कोणतीही व्यक्ती चांगला गुंतवणूकदार होऊ शकते, ज्यामुळे मोठ्या चुकासुध्दा टाळता येतात. येथे मी तुम्हाला यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठीचे साधे व सोपे नियम सांगणार आहे.

प्रथमत: प्लान तयार करा:

निश्र्चितपणे ठरवा कि तुम्ही जोखीमीचा योग्य तो विचार केलेला आहे. गुंतवलेल्या ज्या रकमेची गरज तुम्हाला पुढील २ ते ५ वर्षात लागणार असेल अशी रक्कम म्युच्युअल फंडाच्या लिक्वीड, मनी मार्केट, फ्लोटींग इंटरेस्ट रेट अथवा अल्प मुदतीच्या बॉण्ड मध्ये गुंतवा. जर तुम्ही या पुर्वी अल्प मुदतीच्या उदिष्टांकरीताची गुंतवणूक जास्त जोखमीच्या योजनेत केलेली असेल व जर ती फायद्यात असेल तर अथवा फायद्यात येताच रक्कम काढून घ्या व वर सांगितलेल्या योजनेत गुंतवा. हे सांगावयाची गरज नाही कि बाजाराचा निचांक काय असेल अथवा उच्चांक काय असणार आहे याचे ठोकताळे बांधत बसू नका. प्रथमत: हे लक्षात ठेवा कि अल्प मुदतीच्या उदिष्टांकरीताची रक्कम सुरक्षीत ठेवण्याला प्राधान्य द्या. तुमच्या दिर्घ मुदतीच्या उदिष्टांसाठी म्युच्युअल फंडाच्या समभाग योजनेतच गुंतवणूक करा.

साधी गोष्ट:

दिर्घ मुदतीच्या उदिष्टांसाठी समभाग योजनेतच गुंतवणूक करा व त्यासाठी डायव्हर्सीफाईड इक्वीटी योजनेची (शक्यतो लार्ज कँप किंवा लार्ज अँड मिड कँप फंड योजना) निवड करा. अल्प मुदतीच्या उदिष्टांकरीताची रक्कम फ्लोटींग रेट बॉण्ड फंड योजनेत गुंतवा. हे गुंतवणूकीचे मुळ नियम पाळा. निश्र्चितपणे तुमच्यासमोर गुंतवणूकीचे बरेच काही पर्याय उपलब्ध आहेत अथवा ते तुम्हाला सांगीतले जातील, जसे कि पेट्रो फंड, एमएनसी फंड, गिल्ट इ. स्पेशँलीटी अथवा सेक्टोरल फंडाच्या योजना असतात व त्यात गैर कहिही नाही. परंतु नविन गुंतवणूकदाराने चांगल्या म्युच्युअल फंड हाऊसच्या डायव्हर्सीफाईड इक्वीटी योजनेतच गुंतवणूक करण्याचा साधा नियम पाळावा. दिर्घ मुदतीत अशा योजना अत्यंत फायदेशीर होतात. जर एखाद्या तिमाहीत २५% पेक्षा जास्त नुकसान सहन करण्याची तुमची तयारी नसेल तर स्पेशँलीटी अथवा सेक्टोरल फंडाच्या योजनांपासून दुर रहाणेच शहाणपणाचे असते.

हॉट स्टॉक व फंड योजना टाळा:

जर तुम्ही या वर्षातील सर्वात चांगली कामगिरी करणा-या म्युच्युअल फंड योजनेत व समभागात गुंतवणूक केली असेल तर पुढिल वर्षी त्याच्या निचांकी कामगिरीची तयारी ठेवा. कारण साधा नियम लक्षात ठेवा ज्या गोष्टीची किंमत वर जाते ती खाली येणारच. यासाठीच Reversion to the Mean (परत मध्य गाठलाच जातो) हा नियम आहे.

नियमित गुंतवणूक करत रहा:

आपल्या गुंतवणूक करण्याच्या क्षमतेनुसार कमी अथवा जास्त रक्कम दर महा ठरावीक तारखेला गुंतवत रहाणे हाच जोखीम कमी करण्याचा सर्वोत्तम पर्याय आहे, कारण बाजार उच्चांकी असताना गुंतवणूक करण्याचे या प्रकारेच टाळू शकता. शिवाय अशी सर्वकालीन शहाणी व हुशार व्यक्ती शोधूनही सापडणार नाही कि बाजाराचा कल, तेजीचा किंवा मंदीचा कालावधी (timing) बरोबर साधू शकेल.

गुंतवणूक करा पण विकू नका:

अल्प काळासाठी (वरचेवर) केलेले व्यवहार (trading) हे गुंतवणूकदारापेंक्षा फक्त ब्रोकरलाच श्रीमंत करतात. तसेच हि प्रवृत्ती आयकर विभागालाही आवडते. जर तुम्ही एखाद्या अशा व्यक्तीला भेटलात, कि जो असे सांगतो आहे कि मी अल्प काळाचे व्यवहार (trading) करुन भरपूर पैसे मिळवले आहेत, व तुम्ही याबाबत त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलात तर मनाची तयारी ठेवा कि लवकरच तो या विषयावार बोलण्याचे टाळून दुस-याच एखाद्या विषयाला महत्व देऊ लागेल व ते तुम्हाला ऐकून घ्यावे लागेल. म्हणून साधा नियम पाळा कि फंडात अथवा स्टॉक मध्ये नियमीत गुंतवणूक करत रहा व ती विसरुन जा. यालाच म्हणतात Buy and Hold. 

लवकर सुरुवात करा:

शेअर बाजाराची वेळ महत्वाची नसून तुम्ही किती काळ नियमीत गुंतवणूक करत रहाता हे महत्वाचे असते. चक्रवाढीची ताकद, गुंतवणूकीपासूनचा फायदा तुम्हाला हवा मिळवून देण्यात, तुमच्या बाजूने असते.  म्युच्युअल फंडाचे समभाग योजनेतील गुंतवणूक हि नियमीतपणे व दिर्घ मुदतीसाठीच करत रहावयास हवी. गुंतवणूक करतानाच काळजी घ्या, तुमची उदिष्ठ लक्षात ठेवा, तुमच्या जोखीम स्विकारण्याच्या क्षमतेचे पुन:अवलोकन करा, आणि महत्वाचे म्हणजे रोजच्या रोज शेअर बाजारावर केल्या जाणा-या टिपणीला फार महत्व देऊ नका. तुमच्या भावनाना तुम्ही काळजीपुर्वक घेतलेल्या निर्णयावर विजय मिळवू देऊ नका. म्हणूनच जर तुम्ही अजून गुंतवणूकीला सुरुवात केली नसेल तर लगेचच वेळ फुकट न घालवता सुरुवात करा.

Invest Online

खालील म्युच्युअल फंडात यापुर्वी गुंतवणूक केलेल्या व्यक्ती, ज्यांचा फोलीओ नंबर आहे व केवायसी झालेली आहे फक्त अशाच व्यक्ती ऑनलाईन गुंतवणूक करु शकतात, पीन नसली तरी चालेल.
 
 

 



 
 

 

टंकलेखकाची लिपी / भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...