डायरेक्ट टँक्स कोड (डिटिसी)
ब-याच वाचकांची मागणी होती कि एप्रिल २०१२ पासून येऊ घातलेल्या डायरेक्ट टँक्स कोड (डिटिसी) बीलाबाबत माहिती द्यावी म्हणून हा लेख लिहीत आहे. मंत्रीमंडळाने डायरेक्ट टँक्स कोड (डिटिसी) बील मंजूर केलेले असून, लोकसभेने मंजूरी दिल्यानंतर सध्या अस्तीत्वात असणा-या इंकम टँक्स अँक्ट १९६१ व वेल्थ टँक्स अँक्ट १९५७ रद्द होऊन त्याऐवजी हे बील अंमलात येईल. हे बिल आर्थीक वर्ष २०१२-१३ पासून म्हणजेच १ एप्रिल २०१२ पासून अंमलात येईल. या बिलामुळे होणारे महत्वाचे बदल खालीलप्रमाणे असणार आहेत.
इंकम टँक्सचे दर
सर्वच आयकर दात्यांसाठी हे महत्वाचे आहे. प्रस्तावीत दर खालील प्रमाणे असतील.
वय वर्षे ६५ पर्यंत असणा-या स्त्री व पुरूषांसाठी समान दर
|
उत्पन्न |
आयकर दर |
|
रु.२,००,००० पर्यंत |
०% |
|
रु.२,००,००१ ते रु.५,००,००० |
१०% |
|
रु.५,००,००१ ते रु.१०,००,००० |
२०% |
|
रु.१०,००,००० पेक्षा जास्त |
३०% |
वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असणा-या स्त्री व पुरूषांसाठी समान दर
|
उत्पन्न |
आयकर दर |
|
|
रु.२,५०,००० पर्यंत |
०% |
|
|
रु.२,५०,००१ ते रु.५,००,००० |
१०% |
|
|
रु.५,००,००१ ते रु.१०,००,००० |
२०% |
|
|
रु.१०,००,००० पेक्षा जास्त |
३०% |
|
महत्वाचे मुद्दे
नवीन बीलानुसार सध्या असणारी सवलत रु.१,५०,०००/- पर्यंत, दोन विभागात, वाढवली जाईल.
गृह कर्जाची परतफेड करताना कर्जावरील रु.१,५०,००० पर्यंतचे व्याजाची सवलत पुर्वी प्रमाणेच मिळत राहील मात्र यापुढे मुदलात केल्या जाणा-या परतफेडीवर कोणतीही सवलत मिळणार नाही.
सुट्टीचे कालावधितील प्रवास भत्ता (LTA/LTC) यापुढेही पुर्वीप्रमाणेच चालू राहील, म्हणजेच ४ वर्षात दोन वेळा हि सवलत तुम्हाला मिळत राहील. फरक फक्त एवढाच आहे कि या नंतर एलटिए हा तुमच्या उत्पन्नाचा भाग असेल व तो फॉर्म-१६ मध्ये उत्पन्न म्हणून दाखवला जाईल व त्याची वजावट मान्य मर्यादेपर्यंत स्वतंत्रपणे घेता येईल.
यापुढे वैद्यकीय खर्चापोटी मिळणारा परतावा रु.५०,००० पर्यंत करमुक्त असेल व त्याहून जास्त असणारी रक्कम करपात्र उत्पन्न म्हणून गणले जाऊन त्यावर लागू असणारे आयकर दराप्रमाणे कर भरावा लागेल.
शैक्षणीक कर्जावर दिलेले व्याजावर कर सवलत मिळेल मात्र याची मर्यादा डिटिसीमध्ये स्पष्ट केलेली नाही.
गुंतवणूकदारांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असणारा हा विषय आहे. या पुढेही शेअर्स व इक्वीटी म्युच्युअल फंड योजनेतील गुंतवणूकीपासून मिळणारा दिर्घ मुदतीचा भांडवली नफा पुर्णपणे करमुक्त रहाणार आहे. तसेच यामध्ये कला व दागदागीन्यात केलेल्या गुंतवणूकीचाही अंतर्भाव केलेला आहे, त्यामुळे अशाप्रकारे मिळणा-या नफ्यावर कर भरावा लागणार नाही. तसेच उत्पन्नाच्या प्रमाणात अल्प मुदतीचा भांडवली कराचा दर ठरणार आहे हि बाब स्वागतार्ह आहे.
अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यावर खालील दरपत्रकानुसार कर आकारला जाईल.
|
उत्पन्न |
अल्प मुदतीचा भांडवली कराचा दर |
|
रु.२,००,००० पर्यंत |
०% |
|
रु.२,००,००१ ते रु.५,००,००० |
५% |
|
रु.५,००,००१ ते रु.१०,००,००० |
१०% |
|
रु.१०,००,००० पेक्षा जास्त |
१५% |
यापुढे संपत्तीकर १% दराने आकारला जाणार असून पुर्वीची रु.१५,००,००० ची मर्यादा रु.१,००,००,००० (रु. एक कोटी) पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. संपत्ती कराची आकारणी करण्यासाठी दागदागीने, शहरी भागातील जमीन, इमारत, वाहन, परदेशात ठेवलेल्या बँक ठेवी, परदेशातील ट्रस्टमधील भांडवली गुंतवणूक, परदेशी कंपन्याच्या शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक, रु.५०,००० पेक्षा जास्त किंमतीची घड्याळे, कलेच्या वस्तूत केलेली गुंतवणूक, रु.२,००,००० पेक्षा जास्त असणारी रोख हातशिल्लक या बाबींचा समावेश असणार आहे.
डिटिसी बीलामध्ये काही गोष्टींबाबत खुलासा केलेला नाही, या बाबतचा निर्णय हे बील अंमलात येण्यापुर्वी सरकार घेणार आहे: