सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP):
हा एक बॅंकेचे रिकरींग डिपॉझिटला अतिशय चांगला पर्याय आहे. तसेच ज्या व्यक्ती पिग्मिमध्ये गुंतवणूक करतात त्यांनाही हा चांगला पर्याय आहे. नियमित ठरावीक मुदतीने एकाच चांगल्या स्कीम मध्ये गुंतवणूक करीत राहणे फारच उत्तम. ठरावीक मुदत ही शक्यतो दर महा, दर तीन महिन्यांनी अथवा वार्षिक आपल्या सोयीने ठरवता येते. या मध्ये सरासरीचा फायदा मिळतो कारण आपण मार्केट वर असताना तसेच खाली असताना (जेव्हा आपल्या गुंतवणुकीपोटी जास्त युनिट प्राप्त होतात व सरासरी होते).

उदाहरण 1) ज्यानी 1 जानेवारी 1996 पासून दर महा रु.2000 मात्र गुंतवले आहेत त्यांचे १ ऑगस्ट,२०१० पर्यंत एकूण रु. ३,५०,०००/- गुंतवून झाले व त्या गुंतवणूकीचे मुल्य १५ ऑगस्ट, २०१० रोजी आहे रु.५७,३६,१३७/-.
उदाहरण 2) ज्यानी 1 जानेवारी 2008 पासून दर महा रु.2000 मात्र गुंतवले आहेत त्यांचे १ ऑगस्ट, २०१० पर्यंत एकूण रु. ६२,०००/- गुंतवून झाले व त्या गुंतवणूकीचे मुल्य १५ ऑगस्ट, २०१० रोजी आहे रु.९३,५७७/-.
सर्वोत्तम पर्याय दरमहा नियमित गुंतवणूक पर्याय निवडणे व पुढील तारखेचे चेक अथवा आटो डेबीट फॉर्म भरून देणे.
आमचे मार्फत गुंतवणूक करण्यासाठी येथे टिचकी मारा