जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार

Online Investment

खालील म्युच्युअल फंडात नवीन व्यक्ती तसेच ज्यानी या पुर्वी  या फंडात गुंतवणूक केलेली आहे अशा कोणत्याही व्यक्ती ऑनलाईन गुंतवणूक करु शकतात.






 

सहभागी व्हा

Who's new

  • गोपाल
  • गुरुदास मोरे
  • संदेश बोरसे

Who's online

There are currently 0 users and 1 guest online.

Forward

पतसंस्था, क्रेडिट सोसायटी व ट्रस्ट

पतसंस्था, क्रेडिट सोसायटी, ट्रस्ट व उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती

पतसंस्था, क्रेडिट सोसायटी, सार्वजनीक ट्रस्ट, सहकारी गृहनिर्माण संस्था  अशा प्रकारचे संस्थाकडे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यायोग्य रक्कम असते.  मात्र अशा संस्था या सर्वसाधारणपणे बँकेच्या ठेवींमध्ये अल्प वा दिर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करत असतात.  या ठेवींवर रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार कधी कमी तर कधी जास्त व्याज मिळत असते. मात्र मिळणारे व्याज हे आयकराच्या स्लँब नुसार करपात्र असते. अशा संस्थाचे गुंतवणूकीचे सर्वात महत्वाचे उदिष्ट हे परताव्यापेक्षा सुरक्षीततेवर जास्त असते आणि अशा संस्थांकडे सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे पैसे असतात जे सुरक्षीत ठेवणे हे ह्या संस्थाचे कर्तव्यच असते. 

म्युच्युअल फंडात गुंतवणूकीमध्ये शेअर बाजाराची जोखिम अंतर्भुत असते असाच समज असल्यामुळे ट्रस्ट सारखे संस्थात्मक गुंतवणूकदार त्यापासून दुर रहाणेच पसंत करतात.  परंतु वस्तूस्थिती हि आहे कि जर म्युच्युअल फंडाच्या लिक्वीड स्किममध्ये केलेल्या गुंतवणूकीमध्ये अशा प्रकारची शेअर बाजाराची कोणतीही जोखीम नसते. कारण या योजनेत जमा होणारी रक्कम हि प्रामुख्याने मनीमार्केट मध्ये जास्तीत जास्त ९१ दिवसाच्या मुदतीच्या निश्र्चित उत्पन्न देणा-या उच्च पतदर्जा असणा-या सिक्युरिटीजमध्येच केली जाते, त्यामुळे अशा योजनेत जोखीम जवळपास शुन्य असते.

लिक्वीड फंडात अगदी अल्प काळासाठी म्हणजे २ ते ४ दिवस ते कितीही काळासाठी गुंतवणूक करता येते. अगदी दर शुक्रवारी पैसे गुंतवून, लगेचच जरी पैसे काढण्याची सुचना देता येते, पैसे सोमवारी (कामकाजाच्या दुस-या दिवशी) दुपारी १२ वाजेपर्यंत आपल्या बँक खात्यात जमा होतात.  मिळणारा परतावा हा मात्र ४ दिवसांचा मिळतो कारण अशा योजनेत हिस्टॉरीकल एनएव्ही मिळण्याची सुवीधा असल्यामुळे जरी शुक्रवारी (दुपारी २.३० पर्यंत) गुंतवणूक केली तरी एनएव्ही मात्र गुरुवारची मिळत असते व पैसे रविवारच्या एनएव्हीने परत केले जातात. जर का आपण ह्या सुवीधेचा वापर प्रत्येक आठवडा अखेर त्याप्रमाणे वर्षातील सर्व बँक सुट्यांच्या दिवसांपुरती जरी वापरली तरी मिळणारे उत्पन्न हे जास्तीचेच असते.

तसेच ज्या संस्था वा व्यक्ती उच्च उत्पन्न गटात मोडतात व ज्याना एकूण ३२.४४५% आयकर भरावा लागतो अशानी जर या योजनेत गुंतवणूक डिव्हीडंड पेआऊट या पर्यायाखाली केली तर आयकरात ७.९५% बचत होते, कारण डिव्हीडंड डिस्ट्रीबुशन टँक्सची आकारणी करण्याची पध्दत वेगळी आहे.

लिक्वीड फंड योजनांची मागील कामगीरी जर का आपण पाहिली तर असे दिसून येते कि गेल्या एक वर्षात अशा योजनेतून ८.८०% ते ९.१०% एवढा वार्षीक परतावा मिळालेला आहे, उच्च उत्पन्न गटातील करदात्यांसाठी करपश्र्चात तो सुमारे ६.८७% एवढा होतो. बँकेतून जरी व्याज १०% मिळाले तरी हाच परतावा ६.७६% होतो.

हि योजना चँरिटेबल ट्रस्ट, पतसंस्था, संस्थात्मक गुंतवणूकदार, उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती यांचेसाठी सर्वोत्तम अशी आहे.

लिक्वीड फंडाव्यतरीक्त डेब्ट फंडाच्या अनेक योजना उपलब्ध आहेत मात्र या योजनेत व्याजाचे दर बदलाची तसेच पतमापन दर्जाबदलाची जोखीम असते, ती लिक्वीड फंड योजनेत जवळपास शून्य असते.

या योजनेत गुंतवणूकीचे महत्वाचे फायदे:

१)     चांगला परतावा.

२)     एंट्री व एक्झीट लोड नाही.

३)     कमी एक्सपेन्स रेशो.

४)     मुदत नाही म्हणून पैसे केव्हाही काढता येतात.

५)     बँक ठेवीत पैसे ठरावीक मुदतीसाठी अडकून पडतात तसे या योजनेत अडकून पडत नाहीत.

६)     एकदा का खाते उघडले कि ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी पिन मिळते, तिचा वापर करुन हवे तेव्हा पैसे गुंतवता, काढता येतात.

७)     पैसे काढण्याची सुचना दुपारी २.३० पुर्वी, कोणत्याही कामकाजाच्या दिवशी दिली असता, कामकाजाच्या दुस-या दिवशी आपल्या खात्यात पैसे जमा होतात.

८)     असे खाते उघडण्यासाठी आम्ही मदत करतो.

एफएमपी (फिक्सड् मँच्युरिटी प्लान)

चँरिटेबल ट्रस्ट, पतसंस्था, संस्थात्मक गुंतवणूकदार, उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती ज्या एक ठरावीक काळासाठी गुंतवणूक करु इच्छीतात त्यांचेसाठी एफएमपी (फिक्सड् मँच्युरिटी प्लान) हा एक अतीशय फायदेशीर गुंतवणूक पर्याय आहे. या प्रकारच्या योजनेत ९१ दिवस त ३ वर्षापर्यंत गुंतवणूक करण्याची सुवीधा असते.

या योजनेत गुंतवणूकीचे महत्वाचे फायदे:

१)     लिक्वीड फंडाप्रमाणेच जवळपास शून्य जोखीम.

२)     योजनेत जमा झालेले पैसे जेवढ्या काळाची एफएमपी असेल तेवढ्याच काळाच्या कमर्शीअल पेपर्स, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझीटस्, कर्जरोखे अशा निश्र्चित उत्पन्न देणा-या पर्यायातच केली जाते, ज्यांचा व्याजाचा दर अगोदरच ठरलेला असतो.

३)     अशा योजनेत एक वर्षापेक्षा कमी काळासाठी गुंतवणूक केली तर लिक्वीड फंडाप्रमाणेच कर बचतीचा फायदा होतो.

४)     मात्र जर गुंतवणूकीचा कालावधी ३६६ दिवसांपेक्षा जास्त असेल तर (नवीन येणा-या डायरेक्ट टँक्स कोड नुसार) फक्त १०% लॉंगटर्म कँपिटल गेन टँक्स भरावा लागेल, म्हणजेच सुमारे २२% करबचत होते.

५)     अशा योजना शेअर बाजारात नोंदवल्या जातात, त्यामुळे आवश्यक तर पैसे केव्हाही काढता येतात.

६)     अशा योजनेत केलेल्या गुंतवणूक तारण ठेऊन काही बँका कर्जही देतात.

७)     अशा योजना अगदी थोड्या काळासाठीच गुंतवणूकीसाठी उपलब्ध असतात, म्हणून  आम्हाला संपर्क करा.

अधीक माहिती व गुंतवणूक करण्यासाठी आमच्याशी संपर्क करा.

सदानंद ठाकूर

मोबाईल क्र. ९४२२४३०३०२

इमेल: sadanand.thakur@gmail.com

 

 

Invest Online

खालील म्युच्युअल फंडात यापुर्वी गुंतवणूक केलेल्या व्यक्ती, ज्यांचा फोलीओ नंबर आहे व केवायसी झालेली आहे फक्त अशाच व्यक्ती ऑनलाईन गुंतवणूक करु शकतात, पीन नसली तरी चालेल.
 
 

 



 
 

 

टंकलेखकाची लिपी / भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...