म्युच्युअल फंडाबाबत विस्तृत माहिती मराठी भाषेत प्रथमच उपलब्ध करून देणारे या संकेतस्थळावर आपले मन:पुर्वक स्वागत असो.
सर्वसाधारणपणे आपल्या भारतीय लोकांचा गुंतवणूकीचा कल हा बँक ठेवी, पोस्टाच्या योजना, विमा योजना इ. सुरक्षीत साधनात गुंतवणूक करण्याकडे असतो. खरं पहाता म्युच्युअल फंड हे एक अत्यंत फायदेशीर व प्रभावी गुंतवणूकीचे माध्यम आहे ज्याद्वारे संपत्ती निर्माण होऊ शकते. प्रत्येक व्यक्तीची एक सुप्त इच्छा असते कि आपण करोडपती व्हावे, नियमित गुंतवणूक दिर्घ काळासाठी केली असता आपल्या प्रत्येकाची हि इच्छा म्युच्युअल फंड गुंतवणूकीद्वारे निश्चितच फलद्रुप होऊ शकते. प्रत्येकाची जिवनाकडे पहाण्याची दृष्टी हि जशी वेगवेगळी असते तसेच गुंतवणूकीचे संबंधात जोखिम स्विकारण्याची क्षमता व तयारी व्यक्ती सापेक्ष वेग-वेगळी असते.
"Always remember money isn't everything but make sure that you've made a lot of it before talking such nonsense" ....... Warren Buffet.
हे संकेतस्थळ तुमच्या परिचीत मराठी भाषीकाना कळवा
इक्वीटी (समभाग) योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासंबंधी जोखिमीची व मिळणा-या परताव्याची कल्पना यावी म्हणून आम्ही खाली काही प्रत्यक्षात घडलेली उदाहरणे देत आहोत, हि उदाहणे देताना आम्ही खाजगी म्युच्युअल फंड कंपन्याना त्यांच्या योजना बाजारात आणण्याची मुभा दिल्यानंतरचा कालावधी व सदा सर्वकाळ उत्तम परतावा देणारी डायव्हर्सीफाईड इक्वीटी योजना विचारात घेतली आहे, प्रत्येक इक्वीटी योजनांचे परतावे हे वेगवेगळे असतात:
इक्वीटी फंडात एक रकमी एकदाच केलेली गुंतवणूक - या प्रकारात शेअर बाजाराची सर्वाधीक जोखिम असते. अधिक स्पस्टीकरणासाठी खालील उदाहरण पहा. दिर्घ मुदतीत फार मोठा नफा झालेला आहे तर अल्प मुदतीत नुकसान झालेले आहे.
|
गुंतवणूक केलचयाची तारीख |
गुंतवलेली रक्कम (रु.) |
17 July 2010 रोजी गुंतवणूक मुल्य (रु.) |
|
08/12/1995 |
1,00,000/- |
44,32,026/- |
|
01/01/2008 |
1,00,000/- |
98,557/- |
SWP एकदाच इक्वीटी फंडात रक्कम गुंतवून त्यामधून दरमहा साधारणपणे 1% या दराने नियमित रक्कम काढून घेतली आहे. अधिक स्पस्टीकरणासाठी खालील उदाहरण पहा. दिर्घ मुदतीत फार मोठा नफा झालेला आहे तर अल्प मुदतीत नुकसान झालेले आहे.
|
गुंतवणूक केल्याची तारिख |
गुंतवलेली रक्कम (रु.) |
दर महा काढलेली रक्कम रुपये |
17/7/2010 पर्यंत एकूण काढलेली रक्कम (रु.) |
17 Jul 2010 रोजी गुंतवणूक मुल्य (रु.) |
|
01/07/2002 |
10,00,000/- |
10,000/- |
9,60,000/- |
1,09,09,292/- |
|
01/01/2008 |
10,00,000/- |
10,000/- |
3,00,000/- |
5,37,564/- |
नियमित दरमहा इक्वीटी फंडात गुंतवणूक - गुंतवणूकीचा हा सर्वोत्तम पर्याय आहे असे आम्हाला वाटते: अधिक स्पस्टीकरणासाठी खालील उदाहरण पहा. दिर्घ मुदतीत फार मोठा नफा झालेला आहे तर अल्प मुदतीतहि समाधानकारक नफा झालेला आहे.
|
पासून |
पर्यंत |
दर महा गुंतवणूक (रु.) |
17/7/2010 पर्यंत एकूण गुंतवलेली रक्कम (रु.) |
17 July 2010 रोजी गुंतवणूक मुल्य (रु.) |
|
2/1/1996 |
17/7/2010 |
5,000/- |
8,75,000/- |
1,36,88,566/- |
|
2/1/2008 |
17/7/2010 |
5,000/- |
1,55,000/- |
2,23,310/- |
वरील प्रकारचे इक्वीटी संबंधी योजनातील गुंतवणूकीचा कालावधी हा सर्वात महत्वाचा घटक असतो. गुंतवणूकदार जेवढा अधिक कालावधी आपल्या गुंतवणूकीला देतो व जो नियमितपणे या प्रकारचे योजनेत दिर्घ काळासाठी गुंतवणूक करतो त्याला सर्वाधीक लाभ मिळतो हे यातील महत्वाचे तत्व आहे. म्हणूनच जर आपणास थोडी कँलक्युलेटेड जोखिम स्विकारुन गुंतवणूक करावयाची असेल तर इक्वीटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक हा सर्वोत्तम पर्याय आहे मात्र यात गुंतवणूक करताना जे पैसे आपणास दिर्घ मुदतीसाठी गुंतवता येतील तेवढेच गुंतवावेत. सर्वोत्तम म्हणजे नियमित दरमहा गुंतवणूक दिर्घ काळासाठी करत रहाणे. दिर्घ काळ म्हणजे १५ वर्षापेक्षा अधिक काळ.
सुरक्षीत गुंतवणूकीसाठी डेट फंडाची मासीक उत्पन्न योजना: या योजनेची एक रकमी गुंतवणूक व नियमित गुंतवणूकीची उदाहरणे खाली दिली आहेत.
डेट फंडाचे मासीक उत्पन्न योजनेत एकदाच केलेली गुंतवणूक:
|
गुंतवणूक केलचयाची तारीख |
गुंतवलेली रक्कम (रु.) |
17 Apr 2010 रोजी गुंतवणूक मुल्य (रु.) |
|
29/12/2003 |
1,00,000/- |
2,08,800/- |
याचप्रमाणे डेट फंडाचे योजनेत एकदाच रक्कम गुंतवून त्यातून दर महा इक्वीटी फंडात ठरावीक रक्कम वर्ग करण्याची सुवीधा असते हा सुध्दा एक चांगला पर्याय आहे, ज्यामध्ये जोखिम अत्यल्प असते. त्याचे उदाहरण खालीलप्रमाणे आहे. यामध्ये सुरुवातीची गुंतवणूक डेट फंडाचे मासीक उत्पन्न योजनेत केली असून त्यामधून दरमहा ठरावीक रक्कम जोखिमीचे इक्वीटी फंडात वर्ग केली आहे. या योजनेला सिस्टीमँटिक ट्रान्सफर प्लँन असे संबोधले जाते.
|
पासून |
पर्यंत |
गुंतवलेली रक्कम (रु.) |
दरमहा वर्ग केलेली रक्कम |
एकूण वर्ग झालेली रक्कम |
मुद्दलाचे 07 April 2010 रोजी मुल्य |
वर्ग केलेल्या रकमेचे 07 April 2010 रोजी मुल्य |
|
13/1/2004 |
07/4/2010 |
5,00,000/- |
5,000/- |
3,75,000/- |
4,42,890/- |
9,20,359/- |
आम्ही या संकेतस्थळावर माहितीचा खजिना या विभागात सर्वाधीक माहिती देण्याचा प्रयत्न केलेला असून त्यात नियमित अधिकाधीक माहिती देत रहाण्याचा आमचा प्रयत्न असेल. आपण या विभागाला जरूर भेट देत रहा.
प्रतिक्रीया या विभागाद्वारे आपण आपली या संकेतस्थळाबाबत प्रतिक्रीया नोंदवण्याची सुवीधा या पुर्वी दिली होती मात्र या सुवीधेचा गैर वापर करुन काही लोकानी अश्लील प्रतिक्रीया नोंदवल्यामुळे आम्ही सुवीधा बंद केली आहे. आपणास प्रतिक्रीया द्यावयाची असल्यास आम्हाल इमेलने कळवावी योग्य प्रतिक्रीया आम्ही येथे प्रसिध्द करु. तसेच आपणास काही प्रश्न विचारावयाचे असल्यास इमेल करावा योग्य प्रश्नाना आम्ही व्यक्तीश: उत्तर पाठवू.
इमेल: sadanand.thakur@gmail.com
आम्ही स्वत:च हे संकेतस्थळ ड्रुपलचे सहाय्याने (By using Content Management System provided by www.drupal.org ) बनविले असुन नियमित अपडेटही आम्हीच करतो कारण व्यावसाईकाकडून करुन घेण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. ....सविस्तर वाचा
आपण स्वत: या संकेतस्थळामार्फत गुंतवणूक करून आम्हाला सहकार्य करावे तसेच हे संकेतस्थळ आपले परिचीताना पहाण्यास सांगा हि विनंती.
रिलायन्स म्युच्युअल फंडाचे योजनेत ऑनलाईन गुंतवणूक करणेसाठी