जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार

Online Investment

खालील म्युच्युअल फंडात नवीन व्यक्ती तसेच ज्यानी या पुर्वी  या फंडात गुंतवणूक केलेली आहे अशा कोणत्याही व्यक्ती ऑनलाईन गुंतवणूक करु शकतात.






 

सहभागी व्हा

Who's new

  • गोपाल
  • गुरुदास मोरे
  • संदेश बोरसे

Who's online

There are currently 0 users and 1 guest online.

Forward

पुस्तकाची झलक

शेअर बाजाराची ओळख:

शेअर बाजाराचे कामकाज कसे चालते?

ज्या व्यक्तीला कोणत्याही कंपनीचा समभाग खरेदी/विक्री करावयाचा असतो त्याला प्रथमत: दलालाकडे आपली ऑर्डर नोंदवावी लागते.  दलाल ती ऑर्डर एक्सचेंज कडे पाठवतो त्यानंतर एक्सचेंज मार्फत ती ऑर्डर मर्यादा पाहून पुर्ण केली जाते व शेअर्स खरेदी केलेला असल्यास तो डिमँट खात्यात जमा होतो आणि विक्री केलेली असल्यास नांवे पडतो.  खरेदि-विक्री मर्यादीत प्रमाणात फिजीकल स्वरूपातही केली जाऊ शकते.

शेअर बाजाराबाबत

भारतात प्रामुख्याने दोन स्टॉक एक्सचेंजवर काम चालते.  1) मुंबई स्टॉक एक्सचेंज (Bombay Stock Exchange – BSE) व २) नँशनल स्टॉक एक्सचेंज (National Stock Exchange – NSE).  या व्यतरिक्त देशात 22 प्रादेशीक एक्सचेजीस आहेत.  मात्र देशातील ८०% व्यवहार हे BSE व NSE मार्फत केले जातात.  दोन्ही बाजारावर साधारणपणे सारख्याच प्रमाणात व्यवहार रोज होत असतात.  NSE वर सुमारे 1500 कंपन्यांचे शेअर्स नोंदवलेले आहेत आणि BSE वर 6000 पेक्षा जास्त कंपन्यांचे शेअर्स नोंदवलेले आहेत.  बहुतेक प्रमुख कंपन्यांचे समभागांचा व्यवहार दोन्ही ठिकाणी केला जातो.  BSE चा प्राथमिक निर्देशांक BSE Sensex म्हणून ओळखला जातो ज्याचा आधार हा देशातील प्रमूख ३० कंपन्यांचे समभागांचे भावांवर आधारलेला असतो व NSE चा प्राथमिक निर्देशांक S&P NSE 50 Index (Nifty) म्हणून ओळखला जातो ज्याचा आधार हा देशातील प्रमूख 5० कंपन्यांचे समभागांचे भावांवर आधारलेला असतो. BSE हा सर्वात जुना व म्हणून प्रमुख आधारभूत मानला जातो.  दोन्ही निर्देशांकची गणणा हि देशातील सर्व प्रमुख क्षेत्रातील कंपन्याचे एकूण बाजारमुल्यांवर आधारीत असते.  बाजार दर शनिवार व रविवारी बंद असतो.  दोन्ही बाजार हे पुर्णता संगणीकृत स्वरुपातच चालविले जातात. या प्रणालीला BOLT (BSE On Line Trading) and NEAT (National Exchange Automated Trading) System असे ओळखले जाते.  ज्यामुळे सर्व व्यवहार हे जास्त पारदर्शक व जलद केले जातात.  बीएससी वरील पेपर्स हे 'A', 'B1', 'B2', 'C', 'F' व 'Z' या प्रकारात वर्गीकृत केलेले आहेत. 'A' या प्रकारातील शेअर्स हे बदला सिस्टीमवर समजले जातात म्हणजेच कँरि फॉरवर्ड करता येतात. 'F' या प्रकारात निश्चित उत्पन्न आधारित डेट पेपर्स मध्ये मोडतात. 'Z' या प्रकारातील शेअर्स अथवा पेपर्स हे ब्लँक लिस्टेड म्हणजेच ज्यांचा सौदा केला जात नाही अशा प्रकारात मोडतात.  शेअरबाजारातील सर्वच व्यवहारांवर सेबीचे Securities and Exchange Board of India (SEBI) Ltd., चे नियंत्रण असते.

रोलींग सेटलमेंट सायकल:

रोलींग सेटलमेंट मध्ये बाजारात प्रत्येक दिवशी जे व्यवहार केले जातात त्यांची देव घेवीची आर्थीक पुर्तता हि सर्वसाधारणपणे ३ –या दिवशी केली जाते. या साठी शनिवार, रविवार व सार्वजनीक सुटीचे दिवस वगळले जातात. थोडक्यात सोमवारी आपल्या डिमँट खात्यातून केलेल्या व्यवहारांची पुर्तता बुधवारी व मंगळवारची गुरुवारी या प्रमाणे केली जाते.

खरेदी करिता मर्यादा:

कोणत्याही समभागांची खरेदी करण्यासाठी प्रथमत: आपणास आपल्या बँक खात्यातून डिमँट खात्यात रक्कम वर्ग करावी लागते व तेवढ्या मर्यादेपर्यंतचे किंमतीचे समभाग गुंतवणूकदाराला BSE अथवा NSE वरुन खरेदी करता येतात.  म्हणजेच जी रक्कम आपण समभाग खरेदीसाठी बाजुला काढून ठेवली असेल तेवढ्या रकमेचे समभाग आपण खरेदी करु शकतो.  उदा. जर एका ठरावीक दिवशी आपण रु.१,००,०००/- समभाग खरेदीसाठी बाजुला काढले आहात व त्यातील रु.९८,०००/- चे समभाग खरेदी केले आहात आता खात्यात शिल्लक रक्कम रु.२००० आहे आपण ती रक्कम तशीचे ठेवू शकता, अथवा तेवढ्या किंमतीचे समभाग खरेदी करु शकता अथवा ते आपल्या बँक खात्यात वर्ग करण्याची सुचना देवू शकता.  काही दिवसानी तुम्ही खरेदी केलेल्या समभागांची विक्रि केली व त्यातून बाजार भावानुसार जी रक्कम आपल्या डिमँट जमा होईल ती आपण पुन: समभाग खरेदीसाठी किवा बँक खात्यात वर्ग करुन घेऊ शकता.

समभाग डिमटेरिअलाझड करणे म्हणजे काय?

दोन्ही एक्सचेंजवर ज्या कंपन्यांचे शेअर्सची नोंदणी केलेली असते अशा शेअर्सची खरेदि-विक्री कोणाही व्यक्तीला स्टॉक एक्सचेंजवर नोंदणीकृत असलेल्या कोणत्याही दलालामार्फत करता येते.  शेअर्सची खरेदि-विक्री फिजीकल फॉर्म मध्ये अथवा डिमँट खात्याद्वारे करता येते. सद्याचे काळात शेअर खरेदि-विक्रीचे व्यवहार करण्यासाठी डिमँट खात्याचा वापर मुख्यत्वेकरुन केला जातो.  हे डिमँट खाते स्टॉक एक्सचेंजवर नोंदणीकृत असलेल्या कोणत्याही दलालामार्फत उघडता येते.  हि सुविधा आजकाल अनेक बँका सुध्दा ग्राहकाला देत असतात.  ज्याना शेअर्सची खरेदि-विक्री नियमित स्वरुपात करावयाची आहे त्यानी डिमँट खाते उघडणे अत्यावश्यक आहे.  हे खाते उघडणे हि प्रक्रीया एखाद्या बँकेत खाते उघडण्याएवढीच अत्यंत सोपी आहे.  कोणत्याही स्टॉक एक्सचेंजवर नोंदणीकृत असलेल्या कोणत्याही दलालामार्फत एक फॉर्म भरुन देऊन सोबत, एक फोटो, पँन कार्डची प्रत, रहाण्याचे पत्त्याचा पुराव्याची प्रत, बँक खात्याचा पुरावा व एक चेक देऊन उघडता येते.

 

Invest Online

खालील म्युच्युअल फंडात यापुर्वी गुंतवणूक केलेल्या व्यक्ती, ज्यांचा फोलीओ नंबर आहे व केवायसी झालेली आहे फक्त अशाच व्यक्ती ऑनलाईन गुंतवणूक करु शकतात, पीन नसली तरी चालेल.
 
 

 



 
 

 

टंकलेखकाची लिपी / भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...