जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार

Online Investment

खालील म्युच्युअल फंडात नवीन व्यक्ती तसेच ज्यानी या पुर्वी  या फंडात गुंतवणूक केलेली आहे अशा कोणत्याही व्यक्ती ऑनलाईन गुंतवणूक करु शकतात.






 

सहभागी व्हा

Who's new

  • विकास पै
  • HARIBHAUGAVIT
  • vikaswagh999

Who's online

There are currently 0 users and 1 guest online.

Forward

Logo

रत्नागिरी जिल्ह्यातील व्यक्तीना 

आमचेसोबत काम करुन नियमीत उत्पन्न मिळवण्याची उत्तम  संधी.

प्रत्यक्ष फॉर्म भरुन

प्रत्यक्ष फॉर्म भरुन

गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला फिजीकल स्वरुपात फॉर्म हवे असल्यास Download विभागातून फॉर्म डाऊनलोड करुन घ्या अथवा आम्हाला संपर्क करा आम्ही संपुर्ण जगात कोठेही फॉर्म व त्यासोबत सुचना पत्रही कुरिअर अथवा पोष्टाने पाठवण्याची व्यवस्था करतो. संपूर्ण जगात आमचे गुंतवणूकदार आहेत, मग तुम्ही सुध्दा आमच्या मार्फत गुंतवणूक करुन भावी समृध्द जिवनाची मुहर्तमेढ उभारु शकता.

गुंतवणूक करण्यासाठी मार्गदर्शन:

म्युच्युअल फंडाच्या कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्यासाठी केवायसी (Know Your Customer) करणे बंधनकारक आहे जर आपण प्रथमच गुंतवणूक करणार असाल तर प्रथमत: केवायसी करण्यासाठी KYC Application for Individuals हा फॉर्म आपल्या संगणकावर डाऊनलोड करुन त्याची प्रिंट काढून घ्या.

केवायसीसाठी लागणारी कागदपत्रे:

१)        केवायसी फॉर्म KYC Application for Individuals (यावर प्रथमत: आपला फोटो चिकटवून, अर्धी सही बाहेर व अर्धी सही फोटोवर या प्रमाणे करा, दुसरी सही फॉर्मच्या खालच्या बाजूला सहीसाठी जागा आहे तेथे करावी).

२)        पँन कार्डची प्रत त्यावर तुमची स्वाक्षरी करुन जोडावी.

३)        रहाण्याच्या पत्त्याच्या पुराव्याची प्रत त्यावर तुमची स्वाक्षरी करुन जोडावी (रेशनकार्ड, वीज बील, टेलीफोन बील, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, ड्रायव्हींग लायसन्स, बँकेचे पासबुक – या पैकी कोणत्याही एकाची प्रत चालेल).

गुंतवणूकीसाठी लागणारी कागदपत्रे :

१)        तुम्हाला वरीलपैकी ज्या योजनेत गुंतवणूक करावयाची असेल त्या म्युच्युअल फंड हाऊसचा फॉर्म डाऊनलोड Download करुन त्याची प्रिंट काढून घ्या. फॉर्ममधील माहिती भरा. दुस-या पानावर पहिल्या गुंतवणूकदाराच्या सहीसाठी जागा आहे तेथे तुमची सही करा. गुंतवणूक जास्तीत जास्त तिघांच्या नांवाने करता येते, दोन किंवा तिन नांवाने गुंतवणूक करणार असाल तर तशा सह्या करा, तसेच प्रत्येकाची केवायसी करणे आवश्यक असते हे लक्षात ठेवा.

२)        जर तुम्ही दरमहा नियमीत गुंतवणूक करणार असाल तर सोबतचा इसीएस / अँटो डेबीट फॉर्म भरा व त्यावर गुंतवणूकदारानी सह्या कराव्यात. बँकेत खाते ज्यांचे नांवाने असेल त्यानी बँक खात्याप्रमाणेच सही त्यासाठी असणा-या जागी करावी.

३)        केवायसी झाल्याचा पुरावा अथवा वरीलप्रमाणे केवायसी फॉर्म व त्यासोबत लागणारी कागदपत्रेही जोडावी.

४)        पँन कार्डची प्रत त्यावर तुमची (गुंतवणूकदाराची) सही करुन जोडावी.

५)        ज्या रकमेची गुंतवणूक करावयाची असेल त्या रकमेचा चेक, ज्या योजनेत गुंतवणूक करावयाची असेल त्या योजनेच्या नांवाचा लिहून जोडावा.

६)        नियमीत गुंतवणूकीसाठी (एसआयपी) दरमहा जेवढी गुंतवणूक करावयाची असेल तेवढ्या रकमेचा चेक ज्या योजनेत गुंतवणूक करावयाची असेल त्या योजनेच्या नांवाचा लिहून जोडावा.

वरीलप्रमाणे सर्व कागदपत्रे व फॉर्मस् आमचेकडे खालील पत्त्यावर पोष्टाने अथवा कुरीअरने रवाना करा, त्यापुढील सर्व कार्यवाही आम्ही करु.

ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस्

श्रीदत्त कृपा, बँक ऑफ इंडियासमोर, काविळतळी, चिपळूण-४१५६०५, जिल्हा: रत्नागिरी.

तुम्हाला आमच्याकडून कोणतीही मदत हवी असल्यास मला संपर्क करा मोबाईल क्र. 9422430302 किंवा इमेल करा sadanand.thakur@gmail.com

 

Invest Online

खालील म्युच्युअल फंडात यापुर्वी गुंतवणूक केलेल्या व्यक्ती, ज्यांचा फोलीओ नंबर आहे व केवायसी झालेली आहे फक्त अशाच व्यक्ती ऑनलाईन गुंतवणूक करु शकतात, पीन नसली तरी चालेल.
 
 

 



 
 

 

टंकलेखकाची लिपी / भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...