
रत्नागिरी जिल्ह्यातील व्यक्तीना
आमचेसोबत काम करुन नियमीत उत्पन्न मिळवण्याची उत्तम संधी.
प्रश्न विचारा/प्रतीसाद द्या
आम्ही हे सदर परत नवीनच सुरु करुत आहोत. आपण येथे आम्हाला म्युच्युअल फंडाबाबत प्रश्न विचारु शकता. योग्य त्या प्रश्नाना येथे उत्तरे दिली जातील. सर्वच प्रश्नाना उत्तरे दिली जातील असे नाही. तुम्हाला प्रश्न विचारावयाचे असल्यास mutualfund.tfs@gmail.com येथे इमेल करा.
Q.1 - Asked by Mr. Vishwas Desai 25/11/2011.
मला माझ्या दोन मुलांच्या शिक्षणासाठी सध्याचा येथील शैक्षणीक खर्च विचारात घेता, १७ वर्षानंतर, दर वर्षी प्रत्येक मुलासाठी रु.५० लाख पुढील ५ वर्षे मिळत रहावयास हवेत, मी परदेशात रहात असून मी दरमहा रु.१ लाखाची बचत करु शकतो, तर मला योग्य फंड सुचवा. – विश्वास देसाई.
Ans: दरमहा १५ ते २० वर्षे एसआयपी मार्फत गुंतवणूक केली तर निश्चितच चांगले परतावे मिळू शकतात ज्यातून तुम्ही तुम्ही तुमच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी एक चांगला नीधी निर्माण करु शकता. रु. १ लाखाच्या बचतीवर १२% दराने उत्पन्न मिळाल्यास रु.५ कोटि ७४ लाख नीधी तयार होईल व १५% दराने तोच नीधी रु.९ कोटी नीधी होईल. तुम्हाला दोन्ही मुलांचा मिळून एकूण खर्च ५ वर्षात रु.५ कोटी करावा लागणार आहे. तुमची हि गरज पुर्ण होण्यासाठी तुम्ही ४ वेगवेगळ्या इक्वीटी. म्युच्युअल फंड योजनेत प्रत्यकी रु.२५,०००/- या प्रमाणे गुंतवावेत, यासाठी लार्ज कँपच्या २ योजना, लार्ज व मिड कँपची एक योजना आणि मल्टी कँपची एक योजना निवडावी. १७ वर्षानंतर सर्व रक्कम या योजनेतून काढून गुंवणूकीच्या अन्य सुरक्षीत साधनात गुंतवणे योग्य होईल. लार्जकँप साठी ICICI Prudential Focused Bluechip Equity Fund व DSP Top 100 Equity Fund, लार्ज व मिडकँपसाठी HDFC Top 200 Fund किंवा UTI Dividend Yield Fund व मल्टी कँपसाठी HDFC Equity Fund या योजनांची निवड करावी. तसेच तुमच्या बँक खात्यातून दरमहा नियमीत पैसे गुंतवले जात आहेत याची खात्री करा तसेच या योजनांची कामगीरी कशी होत आहे यावर मधून मधून लक्ष ठेवत रहा जेणेकरुन तुमचे उदिष्ठ साध्य होईल.