
माझ्या वयात मी किती रुपयांची गुंतवणूक करावी? मी किती जोखीम पत्करू शकतो? दिर्घकाळीन फायद्यासाठी अल्पकालीन नुकसान झाले तर मी विचलित तर होणार नाही ना? मला किती काळानंतर गुंतवलेली रक्कम परत हवी? मला तत्काळ पैसे काढावे तर लागणार नाहीत ना? मी माझे पैसे किती काळ गुंतवून ठेवू शकतो? मला कर वाचवण्यासाठी गुंतवणूक करायची आहे का?
म्युच्युअल फंड कंपनीची निवड करा
म्युच्युअल फंड कंपनीची पार्श्वभूमी काय आहे? तुम्ही कंपनीचे नांव ऐकले आहे काय? त्याने मागील काही वर्षात योजनेच व्यवस्थापन कसे केले आहे? योजनेची कामगिरी समान उद्दिष्टाचे योजनेच्या तुलनेत कशी आहे? सेवा कशी दिली जाते? कामकाजात पारदर्शकता आहे का? फंड वारंवार आणि योग्यप्रकारे कामगिरी जाहीर करतो काय? वरील सर्व प्रश्नांची उत्तरे जर सकारात्मक मिळाली तर त्या फंडाची निवड करावयास हरकत नाही.
ज्या योजनेला किमान ५ वर्ष झाली आहेत व जी सतत मार्केट पेक्षा जास्त परतावा देत असेल तरच तिची निवड करा. म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करताना मागील कामगिरी हाच सर्वा महत्त्वाचा निकष असतो. आमचेशी फोन, व्हिडिओ कॉन्फ़रन्स, प्रत्यक्ष भेट अथवा ईमेल द्वारे संपर्क साधा. आमचे मार्फत गुंतवणूक करण्यासाठी येथे टिचकी मारा