भारतीय अर्थव्यवस्था:
आर्थिक वर्ष २००८-०९ हे एकूणच अर्थ व्यवस्थेचे दृष्टीने अत्यंत निराशजनक गेले. जानेवारी २००८ मध्ये सेन्सेक्स २१००० पार करुन गेलेला सेन्सेक्स मागील आर्थिक वर्षात ७७०० पर्यंत घसरला होता. याला मुख्यत्वेकरून कारण होते ते जागतीक मंदिचे. परंतू चालू २००९-१० चे चालू आर्थिक वर्षात पहिल्या सहामाहितच हे मंदिचे सावट दुर होण्याचे संकेत मिळू लागल्यानंतर मात्र १४ ऑक्टोंबर २००९ रोजी सेन्सेक्सने गेल्या १३ महिन्यातील उच्चांक पार करून १७००० चा टप्पाही ओलांडला. एकूणच बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. अजुन मंदिचे पुर्णपणे निवारण झाले आहे असे कोणताही अर्थ तज्ञ विधान करावयास धजत नाही हि वस्तूस्थिती आहे.
गेल्या २००८-०९ व चालू २००९-१० (पहिली सहामाही) या आर्थिक वर्षावर धावती नजर टाकली तर वर्षातील काही प्रमुख घडामोडी:
आंतरराष्ट्रीय घडामोडी
याच काळात भारतीय अर्थ व्यवस्था मात्र टिकून राहिली. कारण गेल्या काही वर्षातील चांगला विकार दर, बचत व गुंतवणूक यांचे योग्य प्रमाण, परकीय चलनाचा भरपूर साठा, रिझर्व्ह बँक व सेबीचे कठोर नियंत्रण, लोकशाही, ६५% तरूणांची संख्या, भारतीय कंपन्यांची चांगली कामगिरी, कुशल व शिक्षीत मनुष्यबळ, घरेलू मालाला घरेलू बाजारपेठेत उठाव.
शेअर बाजार कोसळत असताना अनेक गुंतवणूकदारानी बाजारातून काढता पाय घेउन नुकसान सोसणे पसंत केले मात्र हुषार व योग्य संधीची वाट पहाणारे गुंतवणूकदारानी आपली गुंतवणूक मंदिचे काळात वाढवली व त्यांना त्याचे गोड फळही गेल्या ६ महिन्यातच गुंतवणूकीचे मुल्य १२०% पेंक्षा अधिक वाढून मिळाले. मंदि हि गुंतवणूकीसाठी सुवर्ण संधीच असते फारच थोडे लोक त्याचे सोने करतात.
भारतीय अर्थव्यवस्थेचे भविष्य:
असे म्हटले जाते कि २०२० साली भारत हि एक आर्थिक महासत्ता झालेली असेल. काही लोक याचेशी सहमत आहेत तर ब-याच लोकाना हे एक दिवास्वप्न वाटते. देशातील पायाभूत सुविधांचा अभाव, राजकारणी लोकांचे वर्तन, स्वार्थीपणा, भ्रष्टाचार, कायद्याची वरचेवर होणारी पायमल्ली इ. गोष्टी विचारात घेतल्यास हे दिवास्वप्न वाटणे तसे गैर नव्हे. मात्र हेही तेवढेच सत्य आहे कि या देशातील तरुणानी माहिती तंत्रज्ञानाचे क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. गेले ६२ वर्षे आपल्या देशात कितीही राजकीय उलथापालथी झाल्या असल्या, भ्रष्टाचार झाले, राजकीय तडजोडी झाल्या तरी सुध्दा हे मान्य करावेच लागेल कि लोकशाही टिकून राहिली.
तसे पाहिल्यास १९९२-९३ मध्ये आर्थिक उदारीकरणानंतरच देशातील अर्थव्यवस्थेच्या वाढीचे दिशेने प्रवास सुरू झाला व त्याला खरी गती मिळाली ती २००२-०३ पासुन, म्हणजे साधारणपणे आर्थिक उदारीकरणानंतरचे १० वर्षानी. एक लक्षात घेतले पाहिजे कि गेले १० वर्षे तर आपण कोठे पायाभूत सुविधांचेबाबत गांभीर्याने विचार करावयास लागलो आहोत त्या पुर्वी तर सर्व आनंदि आनंदच होता.
आपला जी.डी.पी. वाढ बाकी जगात उणे होत असतानाही ५ ते ६% पर्यंत सकारात्मक राहिला. भारतीय अर्थव्यवस्थेला काहितरी भवितव्य आहे हे वाटले म्हणूनच देशी उद्योगांमध्ये थेट परकीय गुंतवणूक मोठ्याप्रमाणावर आली. परकीय अर्थसंस्थानी बाजारात गुंतवणूक केली व सन २००८ चा अपवाद वगळता ती सतत वाढतच आहे.
देशात अनेक ठिकाणी सेझ होऊ घातले आहेत, कितीही राजकीय स्वार्थासाठी विरोध झाला तरी ते आज ना उद्या प्रत्यक्षात आणावेच लागतील. देशी उद्योगधंदे परदेशी उद्योग टेक-ओव्हर करु लागले आहेत हे प्रमाण वाढतच जाईल. तरूणांचे उत्पन्नाचा आलेख वाढता आहे, त्यांची खरेदी क्षमता दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. नविन नविन उद्योग धंद्यांची वाढ येत्या काही वर्षात होणे हे अपरिहार्य आहे. या परिस्थितीत पायाभूत सुविधा वाढवणे क्रमप्राप्तच होईल व देशात सद्या मंजुर झालेले पायाभूत प्रकल्प पुर्ण करावेच लागतील. हे सारे होत असताना देशाची आर्थीक स्थिती आपोआपच सुधारली जाईल. या देशाची लोकसंख्या हा जसा शाप आहे त्याचप्रमाणे त्याची दुसरी बाजू म्हणजे खरेदि क्षमता ज्यामुळे देशी उद्योगांची देशांतर्गत बाजारपेठ ८०% पेक्षा अधिक आहे व ती वाढतीच रहाणार आहे. या देशातील काम करणारे व्यक्तिंमध्ये तरुणाईची संख्या जगात सर्वाधीक आहे. काम करणारे भारतीयांचे सरासरी वय ३५ चे आसपास आहे हा आपला सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे. नजीकचे भविष्यकाळात जी.डी.पी. वाढ २ अंकी होणार हे सांगायला कोणा अर्थ तज्ञाची अथवा ज्योतिषाची गरज नाही. हे सारे विचारात घेता अगदि २०२० साली नाही तरी २०२५ ते २०३० पर्यंत भारत हि एक आर्थिक महासत्ता झालेली असेल याबाबत मला तरी तिळमात्रसुध्दा शंका नाही.
आणि म्हणूनच देशातील प्रत्येक मिळवत्या तरुणाने तरी म्युच्युअल फंडात नियमित व किमान आपले टेक होम उत्पन्नाचे २५% रक्कम तरी गुंतवणूक करत राहून देशाचे भविष्यात होणारे प्रगतीबरोबरच आपली वैयक्तिक आर्थिक प्रगती व त्याद्वारे आर्थिक स्वातंत्र प्राप्त करुन घ्यावे. शुभस्य शिघ्रम या उक्तीप्रमाणे कोणताही वेळ न दवडता तत्काळ गुंतवणूकीची सुरुवात अगदी आजपासुनच करावी.
Best of luck to all prospective investors.