
रत्नागिरी जिल्ह्यातील व्यक्तीना
आमचेसोबत काम करुन नियमीत उत्पन्न मिळवण्याची उत्तम संधी.
मासिक उत्पन्न योजना – योजनेच्या सुरुवातीपासूनची कामगिरी
या प्रकारच्या योजनेचे उदिष्ठ प्रामुख्याने नियमीत दरमहा लाभांश देण्याचे असते. या प्रकारच्या योजनेतील गुंतवणूक ७५% ते ९०% सरकारी व खाजगी कंपन्याच्या कर्जरोख्यात व दिर्घ, अल्प मुदतीच्या बँक ठेवी, व्यापारी पेपर आदी नियमीत ठरावीक दराने उत्पन्न देणा-या साधनात केली जाते व शेअर बाजाराचाही फायदा मिळून भांडवली मुल्यवृध्दी व्हावी म्हणून १०% ते २५% रक्कम शेअर बाजारात गुंतवली जाते. नियमीत उत्पन्न मिळवू पहाणा-यांसाठी या योजना चांगल्या असतात. मात्र अशा प्रकारच्या योजनेत व्याजाचे चढ उताराचा परिणाम होत असतो. व्याजदर जेव्हा वाढत जात असतात तेव्हा यातील गुंतवणूक केलेल्या कर्जरोख्यांचे मुल्य कमी होते व जेव्हा व्याजदर कमी असतात तेव्हा त्यांचे मुल्य वाढते. तसेच शेअर बाजाराच्या चढ उतारांचाही परिणाम या योजनांवर होत असतो. शक्यतो व्याजदर कमी नियमीत लाभांश मिळूनही भांडवली मुल्यवृध्दी कशी होते हे समजण्यासाठी आम्ही मुद्दाम येथे देय लाभांश (Dividend Payout) या पर्यायाची मागिल कामगिरी दाखवली आहे. तसेच उदाहरण फक्त एक रकमी गुंतवणूकीचे दिले आहे. या प्रकारच्या योजनेतून गेल्या १० वर्षात सरासरी ७.५०% ते १०% करमुक्त लाभांश दिला गेलेला आहे. देय लाभांश (Dividend Payout) हा पर्याय नियमीत उत्पन्नासाठी तुम्ही म्युच्युअल फंडाच्या कोणत्याही योजनेसाठी वापरु शकता. तुम्ही ऑनलाईन गुंतवणूक करु इच्छीत असल्यास योजनेसमोरील Invest Online या लिंकवर क्लीक करा व जर तुम्ही प्रथमच गुंतवणूक करत असाल तर शक्यतो Download Form वर क्लीक करुन फॉर्म डाऊनलोड करा व याच पानावर दिलेल्या सुचनांचे पालन करा.
ह्या पानावरील माहिती 31 Jan 2012 पर्यंतची असून किमान दर महिना अखेरीला ती अद्यावत करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
Monthly Income Plans – Performance since launch
|
Fund Name |
Launch Date |
NAV |
Absolute Returns in % for SIP |
Value of SIP of Rs.5000/- p.m., since date of launch In Rs. |
Value of Rs.1 Lacs invested on date of launch |
Invest Now |
Download |
|
Birla MIP |
Nov 00 |
27.7 |
63.15% |
10,93,082 |
6,31,500 |
||
|
Birla MIP II Saving 5 |
Apr 04 |
11.43 |
8.13% |
5,02,796 |
1,14,300 |
||
|
Birla MIP II Wealth 25 |
Apr 04 |
11.31 |
5% |
4,88,236 |
1,13,100 |
||
|
DSP MIP |
May 04 |
11.02 |
3.62% |
4,76,659 |
1,10,200 |
||
|
HDFC MIP ST |
Dec 03 |
11.04 |
5.18% |
5,15,383 |
1,10,400 |
||
|
HDFC MIP LT |
Dec 03 |
13.01 |
11.52% |
5,46,429 |
1,30,100 |
||
|
ICICI MIP |
Oct 00 |
11.47 |
4.43% |
7,04,923 |
1,14,700 |
||
|
ICICI MIP 25 |
MAY 04 |
11.95 |
4.07% |
4,83,917 |
1,19,500 |
||
|
Kotak MIP |
Nov 03 |
10.43 |
0.09% |
4,90,465 |
1,04,300 |
||
|
Reliance MIP |
Dec 03 |
10.69 |
-0.51% |
4,82,515 |
1,06,900 |
||
|
SBI Magnum MIP |
Mar 01 |
10.35 |
-0.61% |
6,46,061 |
1,03,500 |
||
|
SBI Magnum MIP Floater |
Nov 05 |
10.47 |
2.23% |
3,78,233 |
1,04,700 |
||
|
TATA MIP Plus |
Feb 04 |
11.08 |
4.46% |
4,96,179 |
1,10,800 |
||
|
TATA MIP |
Apr 97 |
12.12 |
8.23% |
9,47,038 |
1,21,200 |
||
|
UTI MIS |
Oct 02 |
11.63 |
6.33% |
5,95,422 |
1,16,300 |
वरिल योजनेतील ज्या योजनांना ७ वर्षांपेक्षा अधीक काळ झालेला आहे अशा योजनेतून मिळालेला लाभांश हा सध्याचे गुंतवणूक मुल्यापेक्षाही जास्त मिळालेला असून, मुद्दलातही वाढ झालेली आहे, या योजनेत नियमीत उत्पन्न मिळवू इच्छिणा-या व्यक्तीनी त्यांच्या गुंतवणूकीच्या काही टक्के रक्कम गुंतवावी मात्र मिळणा-या परताव्याचा नियमीतपणे पाठपुरावा करावा, यासाठी आम्ही गुंतवणूकदाराना मदत करत असतो.
गुंतवणूक करण्यासाठी मार्गदर्शन:
म्युच्युअल फंडाच्या कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्यासाठी केवायसी (Know Your Customer) करणे बंधनकारक आहे जर आपण प्रथमच गुंतवणूक करणार असाल तर प्रथमत: केवायसी करण्यासाठी KYC Application for Individuals हा फॉर्म आपल्या संगणकावर डाऊनलोड करुन त्याची प्रिंट काढून घ्या.
केवायसीसाठी लागणारी कागदपत्रे:
१) केवायसी फॉर्म (यावर प्रथमत: आपला फोटो चिकटवून, अर्धी सही बाहेर व अर्धी सही फोटोवर या प्रमाणे करा, दुसरी सही फॉर्मच्या खालच्या बाजूला सहीसाठी जागा आहे तेथे करावी).
२) पँन कार्डची प्रत त्यावर तुमची स्वाक्षरी करुन जोडावी.
३) रहाण्याच्या पत्त्याच्या पुराव्याची प्रत त्यावर तुमची स्वाक्षरी करुन जोडावी (रेशनकार्ड, वीज बील, टेलीफोन बील, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, ड्रायव्हींग लायसन्स, बँकेचे पासबुक – या पैकी कोणत्याही एकाची प्रत चालेल).
गुंतवणूकीसाठी लागणारी कागदपत्रे :
१) तुम्हाला वरीलपैकी ज्या योजनेत गुंतवणूक करावयाची असेल त्या योजनेसमोरील फॉर्म डाऊनलोड करुन त्याची प्रिंट काढून घ्या. फॉर्ममधील माहिती भरा. दुस-या पानावर पहिल्या गुंतवणूकदाराच्या सहीसाठी जागा आहे तेथे तुमची सही करा. गुंतवणूक जास्तीत जास्त तिघांच्या नांवाने करता येते, दोन किंवा तिन नांवाने गुंतवणूक करणार असाल तर तशा सह्या करा, तसेच प्रत्येकाची केवायसी करणे आवश्यक असते हे लक्षात ठेवा.
२) जर तुम्ही दरमहा नियमीत गुंतवणूक करणार असाल तर सोबतचा इसीएस / अँटो डेबीट फॉर्म भरा व त्यावर गुंतवणूकदारानी सह्या कराव्यात. बँकेत खाते ज्यांचे नांवाने असेल त्यानी बँक खात्याप्रमाणेच सही त्यासाठी असणा-या जागी करावी.
३) केवायसी झाल्याचा पुरावा अथवा वरीलप्रमाणे केवायसी फॉर्म व त्यासोबत लागणारी कागदपत्रेही जोडावी.
४) पँन कार्डची प्रत त्यावर तुमची (गुंतवणूकदाराची) सही करुन जोडावी.
५) ज्या रकमेची गुंतवणूक करावयाची असेल त्या रकमेचा चेक, ज्या योजनेत गुंतवणूक करावयाची असेल त्या योजनेच्या नांवाचा लिहून जोडावा.
६) नियमीत गुंतवणूकीसाठी (एसआयपी) दरमहा जेवढी गुंतवणूक करावयाची असेल तेवढ्या रकमेचा चेक ज्या योजनेत गुंतवणूक करावयाची असेल त्या योजनेच्या नांवाचा लिहून जोडावा.
वरीलप्रमाणे सर्व कागदपत्रे व फॉर्मस् आमचेकडे खालील पत्त्यावर पोष्टाने अथवा कुरीअरने रवाना करा, त्यापुढील सर्व कार्यवाही आम्ही करु.
ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस्
श्रीदत्त कृपा, बँक ऑफ इंडियासमोर, काविळतळी, चिपळूण-४१५६०५, जिल्हा: रत्नागिरी.
तुम्हाला आमच्याकडून कोणतीही मदत हवी असल्यास मला संपर्क करा मोबाईल क्र. 9422430302 किंवा इमेल करा sadanand.thakur@gmail.com