देशात विमा व्यवसायाचे खाजगीकरण झाल्यापासून अनेक विमा कंपन्या अस्तित्वात आल्या असून त्यांनी जागोजागी त्यांच्या शाखा उघडलेल्या आहेत. सर्वच विमा कंपन्यांनी युनिट लिंक्ड इन्शुअरन्स प्लॅन अर्थात युलिप हे प्रॉडक्ट बाजारात आणले आहे. इन्शुअरन्स कंपन्यांनी गावोगावी त्यांचे एजंट नेमले असून ते लोकांच्या गळ्यात युलिप हे महागडे प्रॉडक्ट, विमा प्रॉडक्ट म्हणून न विकता, गुंतवणुकीचे एक चांगले माध्यम म्हणूनच विकत असतात. तीन वर्ष पैसे भरा, मग भरावयाची गरज नाही, त्याचे एवढे पैसे होतील, तेवढे पैसे होतील अशा बाता मारतात. प्रत्यक्षात युलिपमध्ये पहिल्या वर्षी 20 ते 60 टक्के एवढी रक्कम चार्जेस म्हणून कापली जाते व उर्वरित रक्कमच गुंतवणुकीला वापरली जाते. यामधून एजंटला 12% ते 40%पर्यंत कमिशन दिले जाते. म्हणजेच युलिप हे गुंतवणुकदारापेक्षा एजंटलाच फायदेशीर आहे.
आपले जर ह्या जगातून अकाली जाणे झाले तर आपल्या पश्चात आपल्या प्रियजनांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी विमा हा प्रत्येकालाच अत्यावश्यक आहे. मात्र तो टर्म इन्शुअरन्स स्वरूपात घेणे हे फायदेशीर असते. टर्म इन्शुअरन्समध्ये 30 वर्षे वयाच्या व्यक्तीला वार्षिक रु० 3000 प्रीमियममध्ये रु० 10 लाख व रु० 7500 मध्ये रु० 25 लाखाचा विमा मिळतो. असा टर्म इन्शुअरन्स घेऊन बाकी रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवणे हेच ग्राहकाच्या हिताचे असते. (म्युच्युअल फंड व टर्म इंशुरन्स चे एकत्रीकरण करुन विमा संरक्षण व गुंतवणूक वृध्दी असे उदिष्ट साध्य करता येऊ शकते व तेच फायदेशीर असते - गुंतवणूकदारासाठी या पानावर वयाप्रमाणे गुंतवणूक व टर्म इंशुरन्सचे एक काल्पनीक टेबल दिले आहे ते अवश्य पहा).
|
म्युच्युअल फंड गुंतवणूकीचे माध्यम |
युलिप (Unit Link Insurance Plan) |
|
म्युच्युअल फंड हे पूर्णतः गुंतवणूकीचे साधन आहे |
ULIP हे इंशुरन्स कंपन्याचे प्रॉडक्ट आहे |
|
म्युच्युअल फंडाला एंट्री लोड अजीबात नसतो त्यामुळे सर्व रक्कम गुंतवणूकीला जाते |
युलिप मध्ये पहिल्या वर्षी एंट्री चार्जेस २०% ते ६०% एवढे भारी असतात |
|
नंतर कितीही वेळा गुंतवणूक केली तरी वरील प्रमा़णेच एंट्री लोड लागत नाही व सर्व रक्कम गुंतवणूकिला जाते. |
युलिप मध्ये दुस-या वर्षी एंट्री चार्जेस १% ते १०% एवढे असतात तर तिस-या वर्षापासून १% ते ४% एवढे असतात |
|
एंजटला कमिशन 0.5% ते 0.75% एवढेच मिळते |
एंजटला कमिशन १५% ते ४०% एवढे मिळते |
|
वार्षीक १०% गुंतवणूकी वार्षीक चक्रवाढ पध्दतिने परतावा मिळाला तर ३ -या वर्षी एकूण निव्वळ परतावा सुमारे 33% पेंक्षा जास्त होतो |
वार्षीक १०% गुंतवणूकी वार्षीक चक्रवाढ पध्दतिने परतावा मिळाला तरI ३ -या वर्षी एकूण एकूण गुंतवणूकी एवढेसुध्दा गुंतवणूक मुल्या होत तर नाहीच पण गुंतवणूकदार नुकसानीतच असतो |
|
गुंतवणूक म्हणूनच विकले जाते आणि गुंतवणूकीसाठी योग्य पर्याय |
इंशुरन्स प्रॉडक्ट असूनही गुंतवणूकदारांची दिशाभूल करुन एजंट लोकं हे गुंतवणूक प्रॉडक्ट म्हणूनच विकतात |
|
गुंतवणूकदाराला फायदेशीर व एजंटला योग्य कमिशन मिळते |
गुंतवणूकदाराचे नुकसान व फक्त एजंट साठी फायदेशीर |
|
गुंतवणूकदाराने यात गुंतवणूक करावी |
जीवन विमा हा अत्यावश्यक आहे यात काहीच संशय नाही मात्र तो टर्म इंशुरन्स स्वरुपातच घ्यावा |
आमचे मार्फत म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी येथे टिचकी मारा
म्युच्युअल फंड व युलिप वरिल तुलने बाबत आपले मत जरुर आम्हाला कळवा. तुम्ही वरिल तुलनेशी सहमत असाल तर अन्य जास्तीत जास्त लोकाना हि वेबसाइटची लिंक पाठवून त्याना हि साइट पहाण्यास सांगा http://www.mutualfundmarathi.com हि लिंक पाठवा