जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार

Online Investment

खालील म्युच्युअल फंडात नवीन व्यक्ती तसेच ज्यानी या पुर्वी  या फंडात गुंतवणूक केलेली आहे अशा कोणत्याही व्यक्ती ऑनलाईन गुंतवणूक करु शकतात.






 

सहभागी व्हा

Who's new

  • विकास पै
  • HARIBHAUGAVIT
  • vikaswagh999

Who's online

There are currently 0 users and 2 guests online.

Forward

Logo

रत्नागिरी जिल्ह्यातील व्यक्तीना 

आमचेसोबत काम करुन नियमीत उत्पन्न मिळवण्याची उत्तम  संधी.

लार्ज कँप योजना

मोठ्या भांडवली कंपन्यामधील गुंतवणूक योजनेच्या सुरुवातीपासूनची कामगिरी

या प्रकारच्या योजनेतील पैसे हे नांवाप्रमाणेच मोठ्या आकाराच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवले जातात. मोठ्या कंपन्याची वार्षीक सरासरी वाढ हि स्थीर असते, तसेच या कंपन्या बुडण्याची वा नुकसानीत जाण्याची शक्यता फारच कमी म्हणजे जवळपास नसतेच. या कंपन्याच्या शेअर्स मधील गुंतवणूकीवर मिळणारा परतावाही स्थीर असतो. या कंपन्यांमधील गुंतवणूक तुलनेने कमी जोखीमीची असते. गेल्या १५-२० वर्षात अशा योजनेत केलेल्या गुंतवणूकीवर दिर्घ मुदतीत उत्तम परतावा मिळाल्याचे दिसते. शेअर बाजारात तेजी असताना अशा योजनेतून फार चांगला परतावा मिळतो व मंदी असताना नुकसानही होते. बाजाराबाबत भाकीत करणे अवघड असते मात्र अशा प्रकारच्या योजनेत नियमीत दरमहा (एसआयपीव्दारे) गुंतवणूक करत राहिल्याने बाजारातील तेजी मंदीवर मात करुन भरघोस उत्पन्न मिळवता येऊ शकते. अशा गुंतवणूकीसाठी तुमचे उदिष्ठ किमान ७ वर्षे व शक्यतो १५ वर्षे असावे म्हणून शक्यतो आपल्या निवृत्तीपर्यंतची मुदत निवडावी, पैसे केव्हाही काढण्याची व केव्हाही खाते बंद करण्याची सुवीधा अशा योजनेत असते. तसेच दरवर्षी एसआयपीची रक्कम वाढवत नेणे जास्त फायदेशीर होते. गुंतवणूकीला जितक्या लवकर सुरुवात केली जाते तेवढा चक्रवाढीचा व रुपी कॉस्ट सरासरीचा अधीक फायदा मिळतो. बाजाराच्या कोणत्याही स्थितीमध्ये एसआयपी गुंतवणूक सुरु करावी. या योजनेत गुंतवणूक करुन भविष्यातील अनेक गरजा (लग्न, घर घेणे, गाडी घेणे, मुलांचे शिक्षण, निवृत्तीनंतरची तरतुद इ. अनेक गरजा) वेळच्या वेळी पुर्ण करणे सहज सुलभ होते. तुम्ही ऑनलाईन गुंतवणूक करु इच्छीत असल्यास योजनेसमोरील Invest Online या लिंकवर क्लीक करा व जर तुम्ही प्रथमच गुंतवणूक करत असाल तर शक्यतो Download Form वर क्लीक करुन फॉर्म डाऊनलोड करा व याच पानावर दिलेल्या सुचनांचे पालन करा.

ह्या पानावरील माहिती 31 Jan 2012 पर्यंतची असून किमान दर महिना अखेरीला ती अद्यावत करण्याचा आमचा प्रयत्न राहील.

Equity - Large Cap Category Schemes – Performance since launch

Fund Name

Launch Date

NAV

Absolute

Returns in % for SIP

Value of SIP of Rs.5000/- p.m., since date of launch

In Rs.

Value of Rs.1 Lacs invested on date of launch

Invest Now

Download

Birla SL Index

Sept 02

51.09

92.34%

10,86,724

5,10,900

Invest Online 

Download Form 

DSP Top 100 Equity

Feb 03

96.89

153.30%

13,55,178

9,68,900

Invest Online

Download Form

HDFC Index Sensex Plus

July 02

215.22

145.22%

14,10,007

21,52,200

Invest Online

Download Form

ICICI Pru Focused Bluechip Equity

May 08

16.41

36.31%

3,06,691

1,64,100

Invest Online

Download Form

Reliance Top 200

July 07

11.97

12.6%

3,04,026

1,19,700

Invest Online

Download Form

SBI Magnum Index

Jan 02

44.3

104.7%

12,28,205

4,43,000

Invest Online

Download Form

TATA Index Nifty A

Feb 03

30.96

67.18%

8,94,428

3,09,600

Invest Online

Download Form

UTI Master Share

Oct 86

50.45

128.37%

34,25,622

5,04,500

Invest Online

Download Form

* या योजनांमध्ये वर्ष २००४-५ पर्यंत नियमीतपणे लाभांश दिला जात होता व त्याचा समावेश वरील परताव्यात केलेला नाही, अन्यथा हा परतावा बराच जास्त दिसला असता.

गुंतवणूक करण्यासाठी मार्गदर्शन:

म्युच्युअल फंडाच्या कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्यासाठी केवायसी (Know Your Customer) करणे बंधनकारक आहे जर आपण प्रथमच गुंतवणूक करणार असाल तर प्रथमत: केवायसी करण्यासाठी KYC Application for Individuals हा फॉर्म आपल्या संगणकावर डाऊनलोड करुन त्याची प्रिंट काढून घ्या.

केवायसीसाठी लागणारी कागदपत्रे:

१)        केवायसी फॉर्म (यावर प्रथमत: आपला फोटो चिकटवून, अर्धी सही बाहेर व अर्धी सही फोटोवर या प्रमाणे करा, दुसरी सही फॉर्मच्या खालच्या बाजूला सहीसाठी जागा आहे तेथे करावी).

२)        पँन कार्डची प्रत त्यावर तुमची स्वाक्षरी करुन जोडावी.

३)        रहाण्याच्या पत्त्याच्या पुराव्याची प्रत त्यावर तुमची स्वाक्षरी करुन जोडावी (रेशनकार्ड, वीज बील, टेलीफोन बील, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, ड्रायव्हींग लायसन्स, बँकेचे पासबुक – या पैकी कोणत्याही एकाची प्रत चालेल).

गुंतवणूकीसाठी लागणारी कागदपत्रे :

१)        तुम्हाला वरीलपैकी ज्या योजनेत गुंतवणूक करावयाची असेल त्या योजनेसमोरील फॉर्म डाऊनलोड करुन त्याची प्रिंट काढून घ्या. फॉर्ममधील माहिती भरा. दुस-या पानावर पहिल्या गुंतवणूकदाराच्या सहीसाठी जागा आहे तेथे तुमची सही करा. गुंतवणूक जास्तीत जास्त तिघांच्या नांवाने करता येते, दोन किंवा तिन नांवाने गुंतवणूक करणार असाल तर तशा सह्या करा, तसेच प्रत्येकाची केवायसी करणे आवश्यक असते हे लक्षात ठेवा.

२)        जर तुम्ही दरमहा नियमीत गुंतवणूक करणार असाल तर सोबतचा इसीएस / अँटो डेबीट फॉर्म भरा व त्यावर गुंतवणूकदारानी सह्या कराव्यात. बँकेत खाते ज्यांचे नांवाने असेल त्यानी बँक खात्याप्रमाणेच सही त्यासाठी असणा-या जागी करावी.

३)        केवायसी झाल्याचा पुरावा अथवा वरीलप्रमाणे केवायसी फॉर्म व त्यासोबत लागणारी कागदपत्रेही जोडावी.

४)        पँन कार्डची प्रत त्यावर तुमची (गुंतवणूकदाराची) सही करुन जोडावी.

५)        ज्या रकमेची गुंतवणूक करावयाची असेल त्या रकमेचा चेक, ज्या योजनेत गुंतवणूक करावयाची असेल त्या योजनेच्या नांवाचा लिहून जोडावा.

६)        नियमीत गुंतवणूकीसाठी (एसआयपी) दरमहा जेवढी गुंतवणूक करावयाची असेल तेवढ्या रकमेचा चेक ज्या योजनेत गुंतवणूक करावयाची असेल त्या योजनेच्या नांवाचा लिहून जोडावा.

वरीलप्रमाणे सर्व कागदपत्रे व फॉर्मस् आमचेकडे खालील पत्त्यावर पोष्टाने अथवा कुरीअरने रवाना करा, त्यापुढील सर्व कार्यवाही आम्ही करु.

ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस्

श्रीदत्त कृपा, बँक ऑफ इंडियासमोर, काविळतळी, चिपळूण-४१५६०५, जिल्हा: रत्नागिरी.

तुम्हाला आमच्याकडून कोणतीही मदत हवी असल्यास मला संपर्क करा मोबाईल क्र. 9422430302 किंवा इमेल करा sadanand.thakur@gmail.com

Invest Online

खालील म्युच्युअल फंडात यापुर्वी गुंतवणूक केलेल्या व्यक्ती, ज्यांचा फोलीओ नंबर आहे व केवायसी झालेली आहे फक्त अशाच व्यक्ती ऑनलाईन गुंतवणूक करु शकतात, पीन नसली तरी चालेल.
 
 

 



 
 

 

टंकलेखकाची लिपी / भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...