जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार

Online Investment

खालील म्युच्युअल फंडात नवीन व्यक्ती तसेच ज्यानी या पुर्वी  या फंडात गुंतवणूक केलेली आहे अशा कोणत्याही व्यक्ती ऑनलाईन गुंतवणूक करु शकतात.






 

सहभागी व्हा

Who's new

  • विकास पै
  • HARIBHAUGAVIT
  • vikaswagh999

Who's online

There are currently 0 users and 2 guests online.

Forward

Logo

रत्नागिरी जिल्ह्यातील व्यक्तीना 

आमचेसोबत काम करुन नियमीत उत्पन्न मिळवण्याची उत्तम  संधी.

लिक्वीड फंड

अल्प व मध्यम मुदतीसाठी Liquid Fund योजना:

अशाप्रकारच्या योजनेतील गुंतवणूक हि बहुतांशी अल्प मुदतीच्या मनी मार्केट सिक्युरिटीमध्ये व थोडी रक्कम हि अल्प मुदतीच्या कर्जरोख्यात केली जाते. जेव्हा व्याजदरात वाढ होते तेव्हा अशा प्रकारच्या योजनेतून चांगले उत्पन्न मिळते. या योजनेत जोखीम जवळपास नसते. या प्रकारच्या योजनेत अगदी २/३ दिवस ते ६ महिने एवढ्या काळासाठी गुंतवणूक करणे योग्य होते. ज्याच्या बचत व चालू खात्यात जास्तीची रक्कम असते त्यानी या योजनेत अवश्य गुंतवणूक करावी. तसेच पतसंस्था, ट्रस्ट, सोसायटी, कंपन्या, व्यापारी ज्याच्या चालू खात्यात मोठी रक्कम शिल्लक असेल त्याप्रत्येक वेळी या योजनेत (लिक्वीड फंड) गुंतवणूक करुन जास्त उत्पन्न मिळवण्याची संधी घ्यावी.

हे पान  31 Jan 2012 रोजीची कामगीरी दाखविणारे असून, प्रत्येक महिन्याचे अखेरीला आम्ही या पानावर अद्यावत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Liquid Funds for Short to Medium Term – One Year Returns

Fund Name

Launch Date

NAV

Returns %

Invest Now

Download

Birla Sunlife Floating Rate ST

June 03

174.32

9.15%

Invest Online

Download Form

DSBR Liquidity

Mar 98

25.10

8.94%

Invest Online

Download Form

Fidelity Cash

Nov 06

14.32

8.90%

Invest Online

Download Form

HDFC Liquid Premium

Feb 03

21.23

9.15%

Invest Online

Download Form

ICICI Liquid super Inst.

Nov 05

156.68

9.17%

Invest Online

Download Form

Kotak Floater ST

July 03

17.34

9.27%

Invest Online

Download Form

Reliance Liquidity

June 05

15.96

9.22%

Invest Online

Download Form

SBI InstaCash

May 99

2347.59

8.89%

Invest Online

Download Form

TATA Liquid Super HI

May 03

1956.55

9.19%

Invest Online

Download Form

UTI Money Market

Apr 97

1186.89

9.20%

Invest Online

Download Form

गुंतवणूक करण्यासाठी मार्गदर्शन:

म्युच्युअल फंडाच्या कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्यासाठी केवायसी (Know Your Customer) करणे बंधनकारक आहे जर आपण प्रथमच गुंतवणूक करणार असाल तर प्रथमत: केवायसी करण्यासाठी KYC Application for Individuals हा फॉर्म आपल्या संगणकावर डाऊनलोड करुन त्याची प्रिंट काढून घ्या.

केवायसीसाठी लागणारी कागदपत्रे:

१)        केवायसी फॉर्म (यावर प्रथमत: आपला फोटो चिकटवून, अर्धी सही बाहेर व अर्धी सही फोटोवर या प्रमाणे करा, दुसरी सही फॉर्मच्या खालच्या बाजूला सहीसाठी जागा आहे तेथे करावी).

२)        पँन कार्डची प्रत त्यावर तुमची स्वाक्षरी करुन जोडावी.

३)        रहाण्याच्या पत्त्याच्या पुराव्याची प्रत त्यावर तुमची स्वाक्षरी करुन जोडावी (रेशनकार्ड, वीज बील, टेलीफोन बील, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, ड्रायव्हींग लायसन्स, बँकेचे पासबुक – या पैकी कोणत्याही एकाची प्रत चालेल).

गुंतवणूकीसाठी लागणारी कागदपत्रे :

१)        तुम्हाला वरीलपैकी ज्या योजनेत गुंतवणूक करावयाची असेल त्या योजनेसमोरील फॉर्म डाऊनलोड करुन त्याची प्रिंट काढून घ्या. फॉर्ममधील माहिती भरा. दुस-या पानावर पहिल्या गुंतवणूकदाराच्या सहीसाठी जागा आहे तेथे तुमची सही करा. गुंतवणूक जास्तीत जास्त तिघांच्या नांवाने करता येते, दोन किंवा तिन नांवाने गुंतवणूक करणार असाल तर तशा सह्या करा, तसेच प्रत्येकाची केवायसी करणे आवश्यक असते हे लक्षात ठेवा.

२)        जर तुम्ही दरमहा नियमीत गुंतवणूक करणार असाल तर सोबतचा इसीएस / अँटो डेबीट फॉर्म भरा व त्यावर गुंतवणूकदारानी सह्या कराव्यात. बँकेत खाते ज्यांचे नांवाने असेल त्यानी बँक खात्याप्रमाणेच सही त्यासाठी असणा-या जागी करावी.

३)        केवायसी झाल्याचा पुरावा अथवा वरीलप्रमाणे केवायसी फॉर्म व त्यासोबत लागणारी कागदपत्रेही जोडावी.

४)        पँन कार्डची प्रत त्यावर तुमची (गुंतवणूकदाराची) सही करुन जोडावी.

५)        ज्या रकमेची गुंतवणूक करावयाची असेल त्या रकमेचा चेक, ज्या योजनेत गुंतवणूक करावयाची असेल त्या योजनेच्या नांवाचा लिहून जोडावा.

६)        नियमीत गुंतवणूकीसाठी (एसआयपी) दरमहा जेवढी गुंतवणूक करावयाची असेल तेवढ्या रकमेचा चेक ज्या योजनेत गुंतवणूक करावयाची असेल त्या योजनेच्या नांवाचा लिहून जोडावा.

वरीलप्रमाणे सर्व कागदपत्रे व फॉर्मस् आमचेकडे खालील पत्त्यावर पोष्टाने अथवा कुरीअरने रवाना करा, त्यापुढील सर्व कार्यवाही आम्ही करु.

ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस्

श्रीदत्त कृपा, बँक ऑफ इंडियासमोर, काविळतळी, चिपळूण-४१५६०५, जिल्हा: रत्नागिरी.

तुम्हाला आमच्याकडून कोणतीही मदत हवी असल्यास मला संपर्क करा मोबाईल क्र. 9422430302 किंवा इमेल करा sadanand.thakur@gmail.com

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Invest Online

खालील म्युच्युअल फंडात यापुर्वी गुंतवणूक केलेल्या व्यक्ती, ज्यांचा फोलीओ नंबर आहे व केवायसी झालेली आहे फक्त अशाच व्यक्ती ऑनलाईन गुंतवणूक करु शकतात, पीन नसली तरी चालेल.
 
 

 



 
 

 

टंकलेखकाची लिपी / भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...