जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार

सहभागी व्हा

Who's new

  • dnyaneshghode
  • d123daddy
  • 15

Who's online

There are currently 0 users and 2 guests online.

Google Ads

संज्ञा व तपशिल

म्युच्युअल फंड कंपनी तिचे योजनेची संपूर्ण माहिती (Offer Document) योजना सुरु करतनाच जाहिर करते गुंतवणूक करताना प्रत्येक गुंतवणूकदाराने ते वाचून समजून उमजून गुंतवणूकदाराने गुंतवणूक करावी म्हणजे नंतर पश्चातापाची वेळ येत नाही.  त्या माहिती पत्रकात (Offer Document) काही संज्ञा वापरल्या जातात त्या इंग्रजी आद्याक्षरानुसार खाली दिल्या असून त्याचा थोडक्यात अर्थ तपशिलामधे दिला आहे.  जिज्ञासूनी याचा जरुर वापर करावा.


संज्ञा तपशिल
AccountStatement खाते उतारा - प्रत्येक व्यवहाराची तपशिवार नोंद प्रत्येक व्यवहारानंतर गुंतवणूकदाराला याव्दारे कळविला जातो - जसे की खरेदि, विक्रि, डिव्हीडंड, बोनस इ.
Ajusted NAV सर्व भार, खर्च वजा जाता एका युनिटचे निव्वळ मुल्य
Annual Report वार्षीक अहवाल
AnnualzedReturns निव्वळ वार्षीक परतावा
Asset Allocation गुंतवणूकीचा विगतवार तपशिल
AMC म्युचलफंडाचे व्यवस्थापन करणारी कंपनी
Average Cost वेगवेगळ्या वेळी व वेगवेगळ्या किंमतिला खरेदि केलेल्या युनिटसची सरासरी किंमत
Balance Fund अशी योजना की ज्यामधे ठरावीक प्रमाणात शेअर बाजारात व ठरावीक प्रमाणात कर्जरोख्यात गुंतवणूक केली जाते.  तुलनात्मकदॄष्ट्या कमी जोखमिची योजना.
Bear Market मंदिचा काळ - जेव्हा बाजारात विक्रिचा जोर असतो
Benchmark योजनेची तुलना करण्यासाठी - जसे की बॅंकिंग फंडाची तुलना बॅंक इंडेक्सचे परताव्या बरोबर केली जाते.
Beta बेटा जेवढा जास्त तेवढा मुल्यामधे जास्त चढ उतार व बेटा जेवढा कमी तेवढा कमी चढ उतार
Bond कर्ज रोखा - ठरावीक तारखेला ठरावीक व्याज दराने कर्जावू घेतलेली रक्कम परत करण्याचा वायदा असलेला पेपर
Bonus जादा दिली जाणारी युनिटस बोनस युनिट नंतर युनिटसची संख्या वाढते पण प्रती युनिट किंमतही कमी होते.
Broker म्युचल फंड कंपनीकडे नोंदलेला मध्यस्थ - जो कंपनीच्या योजनांची माहिति गुंतवणूक दाराला देवून फंडाचे वतीने गुंतवणूक जमा करतो व सल्लहि देतो उदा. ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस.
BSE Index मुंबई स्टॉक एक्सचेंज - ३० कंपन्याचे किमतिवर आधारलेला असतो ज्याचे चढ उताराने बाजाराची दिशा समजण्यास मदत होते.
Bull Market तेजीचा कालखंड - यावेळी गुंतवणूकदारांचा कल खरेदिकडे असतो.
Capital Gain भांडवली मुल्यात झालेली वाढ - एक वर्षाचे आत विक्रि केल्यास अल्प मुदतिचा भांडवली नफा समजला जातो ज्यावर इंकम टॅक्स प्रचलित दराने भरावा लागतो सध्या १५% आहे - एक वर्षानंतर विक्रि केल्यास दिर्घ मुदतिचा भांडवली नफा समजला जातो सध्या इंकम टॅक्स लागु नाही.मात्र अनिवासि भारतियाना दोन्हवर टॅक्स भरावा लागतो
CD सर्टिफिकेट आफ डिपॉझीट - हे फक्त शेड्यूल्ड बॅंका ९१ दिवस ते १२ महिन्याचे मुदतीसाठी जारी करतात व DFI १ ते ३ वर्षासाठी जारी करतात. एक प्रकारचे विना तारण वचन पत्र असते (Promissory Note).
Close-EndedScheme निश्चित मुदत असणारी मुदतबंद योजना - २ ते १५ वर्ष कालावधिची असते.  योजनेच्या सुरुवातिचे ठराविक काळातच यांत गुंतवणूक करता येते त्यानंतर युनिटसची खरेदि-विक्री फक्त नोंदविलेल्या स्टॉक एक्सचेंज व्दाराच करता येते.
CP कमर्शिअल पेपर - चालू भांडवलाची गरज भागविण्यासाठी लहान मोठे उद्योजक जारी करतात - विनातारण असतात - कमी किंमतीला विकले जाते - गरजेच्या निकडिनुसार मुल्य ठरते व मुदत साधारणपणे ३ महिने ते १ वर्षाची असते - मुदतीअंती पूर्ण किंमतिला पुनः खरेदि करावयाचे असते.
Compliance Officer गुंतवणूकदारांच्या विविध कायदेशीर समस्या सोडविण्यासाठी AMC याची नेमणूक करते.
CDSC Contingent Deferred Sales Charge - हा एक प्रकारचा ठरावीक काळापूर्वी पैसे काढल्यास लागणारा निर्गमन आकार आहे.
Corpus सर्व गुंतवणूकदारानी मिळून एका योजनेत गुंतवलेली एकूण रक्कम.
COC/TC Cost of Churning/Turnover Cost - शेअर्सच्या प्रत्येक खरेदि-विक्री वर होणारा खर्च जसे की कमिशन, कस्टोडियन फी, रजिस्ट्रेशन फी, टॅक्स इ.  जेवढेवेळा व्यवहार करावे तेवढेवेळ हे खर्च करावे लागतात कधी कधी तर हे खर्च होणारा नफाही खाउन जातात आणि म्हणूनच टायमिंग चुकल्यामुळे सर्व सामान्य गुंतवणूकदार फक्त दलालांसाठी काम करतो व स्वतः मात्र नुकसान सोसतो. फंड मॅनेजर मात्र हा खर्च कमी करण्याची काळजी घेत असतात.
Custodian ह्यांचे ताब्यात योजनेची सर्व मालमत्ता, शेअर्स, रोखे इ. सांभाळण्यासाठी असते.
Cutoff Time प्रत्येक योजनेच्या खरेदि व विक्री साठी दिवसाची ठरवलेली वेळ या वेळे पुर्वी युनिटची खरेदि व विक्री केल्यास त्या दिवसाच्या NAV ने व्यवहार पुरे केले जातात व या वेळेनंतर केल्यास दुस-या दिवशीच्या NAV ने व्यवहार पुरे केले जातात.