जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार

सहभागी व्हा

Who's new

  • badveprasad2005
  • brian500
  • थत्ते श्रीकांत

Who's online

There are currently 0 users and 1 guest online.

जाहीरात

आरोग्यं धनसंपदा

प्रतीबंधात्मक आरोग्य तपासणी

बाबत जाणून घेण्यासाठी

येथे टिचकी मारा

संपूर्ण रक्कम गुंतवा

संपुर्ण रक्कम गुंतवा

दि. 1 ऑगस्ट 2009 पासुन सेबीने म्युचल फंडात गुंतवणुक करताना लागणारा एंट्री लोड जो  यापुर्वी 2.25% लागत होता तो काढून टाकण्याचा निर्णय जाहिर केला आहे.  यामुळे दि. 1 ऑगस्ट 2009 पासुन केलेल्या गुंतवणुकीची संपुर्ण रक्कम कोणतीही वजावट न होता म्युचल फंड योजनेत गुंतवली जाते.

यापुर्वी म्युचल फंड वितरकाला तो देत असलेल्या सेवेपोटी फंड हाऊस कडून गुंतवणूकीचे 2% ते 2.5% कमिशन दिले जात होते ते आता बंद झाले असून यापुढे वितरक जी सेवा गुंतवणूकदाराला देतो त्यची फी गुंतवणूकदार व वितरक यानीच ठरवावयाची असून ती गुंतवणूकदाराने स्वतंत्र चेकने वितरकाला द्यावयाची आहे.  सद्या म्युच्युअल फंड कंपन्या आम्हाला ०.४०% ते ०.७५% या दराने कमिशन देतात, या व्यतरिक्त आम्हाला प्रती वर्ष ०.४०% ते ०.५०% या दराने एकूण गुंतवणूक मुल्यावर ट्रेल कमिशन मिळते.

खुष खबर

या संकेतस्थळामार्फत जर आपण गुंतवणूक केली तर आम्ही गुंतवणूकदाराकडून कोणतीही फी न आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

म्हणजेच जर तुम्ही या संकेतस्थळावरुन तुम्हाला हव्या त्या योजनेचा फॉर्म फक्त आपले संगणकावर उतरवून घेतला व तो भरुन सोबत चेक अथवा डिमांड ड्राफ्ट, आवश्यक तेथे पँन कार्डची प्रत जोडून आमचेकडे कुरिअर अथवा पोष्टाने पाठविल्यास तुमची संपुर्ण रक्कम गु्तवणूकीला कोणताही आकार अथवा फी न देता म्युचल फंड योजनेत गुंतवली जाईल.

सेबीचे मार्गदर्शक तत्त्वांनुसार जर गुंतवणूकदार कोणत्याही म्युचल फंडाचे एका योजनेत रुपये 50000 किंवा अधिक गुंतवावयाचे असतिल तर KYC (Know Your Customer) ची पुर्तता करणे आवश्यक आहे व ही पुर्तता एकदाच करावी लागते त्यासाठी KYC Form भरुन त्यावर फोटो चिकटवून व सहि करुन सोबत पँन कार्ड व रहाण्याचे पत्त्याचा पुराव्याची प्रत जोडून एकदाच आमचेकडे पाठवावयाची आहे.  हे एकदाच केले की यानंतरचे गुंतणूक करताना कोणताही कागद जोडावा लागत नाही.  नंतर फक्त सही केलेला फॉर्म व चेक / डि.डि एवढेच पाठवावे लागते. म्हणून शक्यतो प्रत्येक गुंतवणूकदाराने याची एकदाच पुर्तता करुन देणे इष्ट असते. रु.49,999/- पर्यंतची गुंतवणूक करताना KYC (Know Your Customer) ची पुर्तता करणे बंधनकारक नाही मात्र पँन कार्डची फोटो प्रत जोडणे आवश्यक आहे.

सेबीचे मार्गदर्शक तत्त्वांनुसार जर गुंतवणूकदार कोणत्याही म्युचल फंडाचे योजनेत गुंतवणूक करताना पँन कार्ड जोडणे बंधनकारक आहे. मात्र वार्षीक रु.50000 पर्यंत SIP द्वारे गुंतवणूक केल्यास पँन कार्ड नसले तरी चालते फक्त कोणते ही एक फोटो असणारे ओळखपत्र दिले तरी चालते.

आमचे मार्फत गुंतवणूक करा