जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार

Online Investment

खालील म्युच्युअल फंडात नवीन व्यक्ती तसेच ज्यानी या पुर्वी  या फंडात गुंतवणूक केलेली आहे अशा कोणत्याही व्यक्ती ऑनलाईन गुंतवणूक करु शकतात.






 

सहभागी व्हा

Who's new

  • गोपाल
  • गुरुदास मोरे
  • संदेश बोरसे

Who's online

There are currently 0 users and 0 guests online.

Forward

सुवर्ण संधी

गुंतवणूकिची सुवर्ण संधी

 दि.२६ ऑगष्ट २०१० ते ९ सप्टेंबर २०१० या कालावधीत रिलायन्स स्मॉल कँप फंड योजनेत गुंतवणूकीची उत्तम संधी आहे.  या काळात जे गुंतवणूकदार या योजनेत गुंतवणूक करतील त्याना रु.१० या दराने युनीटस् प्राप्त होतील.  या योजनेचे उदिष्ठ छोट्या कंपन्यांचे समभागात गुंतवणूक करुन दिर्घ काळात भांडवली वृध्दी करण्याचे आहे.  आज ज्या छोट्या कंपन्या ज्यांचे समभाग कमी किंमतीत उपलब्ध आहेत व भविष्यात ज्या कंपन्या मोठ्या होऊ शकतात अश्या कंपन्याचे समभागात या योजनेद्वारा गुंतवणूक केली जाईल. ह्या योजनेचे थोडक्यात वर्णन करावयाचे झाल्यास जास्त जोखिम म्हणजेच जास्त उत्पन्न मिळण्याची शक्यता असे करता येईल.  जे गुंतवणूकदार जास्त नफा मिळण्यासाठी कँलक्युलेटेड रिस्क घेण्यास तयार असतात त्यांचेसाठी हि योजना म्हणजे एक सुवर्ण संधीच आहे.    या योजनेत एक रकमी तसेच नियमीत दर महा गुंतवणूक करण्याची सुविधा उपलब्ध आहे.  एक रकमी गुंतवणूकीसाठी किमान रुपये पाच हजार गुंतवता येतील कमाल गुंतवणूकीसाठी कोणतीही मर्यादा नाही.  नियमीत गुंतवणूक दर महा रुपये पाचशे पासून कितीही करता येईल.

 

या योजनेचे फंड मँनेजर श्री. सुनिल सिंघानीया हे असून तेच रिलायन्स ग्रोथ फंड, रिलायन्स बँकिंग फंड, डायव्हर्सीफाईड पॉवर सेक्टर फंड आदी योजनाही मँनेज करत आहेत. रिलायन्स ग्रोथ फंड  हि योजना ८ डिसेंबर १९९५ साली सुरू झाली तेव्हा युनीटचा दर होता रु.१० आज तो दर आहे रु.५००/- प्रती युनीट.  या योजनेत ८ डिसेंबर १९९५ रोजी ज्यानी रुपये एक लाख गुंतवले होते त्या गुंतवणूकीचे २३ ऑगष्ट २०१० रोजी मुल्य आहे रुपये ४७ लाख.  तसेच या योजनेत ज्यानी १ जाने १९९६ पासून दरमहा रुपये १००० मात्र गुंतवले होते त्यांचे १ ऑगष्ट २०१० पर्यंत रु.१,७६,००० गुंतवून झाले व त्या गुंतवणूकीचे २३ ऑगष्ट २०१० रोजी मुल्य आहे रुपये ३० लाख सुमारे.  शेअर बाजाराने गेल्या ३० वर्षात वार्षीक सरासरी २०% उत्पन्न गुंतवणूकदाराला दिलेले आहे.  तसेच वाईटात वाईट कालखंडातसुध्दा ७ वर्षे गुंतवणूक केली असता वार्षीक सरासरी १२% उत्पन्न गुंतवणूकदाराला दिलेले आहे.  आजकालचे बँक ठेवीवर मिळणारे अत्यल्प व्याज व दरवर्षी वाढणारी महागाई विचारात घेता प्रत्येकानेच म्युच्युअल फंड योजनेत काही रक्कम गुंतवणूक करणे अत्यावश्यक आहे.  म्युच्युअल फंडाचे योजनेत गुंतवणूक करताना ती दिर्घ मुदतीसाठीच करावी (किमान ७ वर्षासाठी).  ज्याना अल्प मुदतीसाठी गुंतवणूक करावयाची आहे त्यानी डेट म्युच्युअल फंड योजनेत करावी.  तसेच म्युच्युअल फंडात नियमीत दर महा गुंतवणूक करण्याचा पर्याय हा सर्वोत्तम समजला जातो कारण यात सरासरी होते ज्यामुळे जोखिम कमी होते.  आजकाल नियमीत गुंतवणूक करणे हे अत्यंत सुलभ झाले आहे कारण एकदाच एक चेक दिल्यानंतर पुढील हप्ते हे आपल्या बँक खात्यातून परस्पर वळते करण्याची सुवीधा यात आहे. म्युच्युअल फंडात मासिक उत्पन्न योजना सुध्दा असून हि योजना निवृत्त व्यक्तींसाठी उत्तम पर्याय आहे, या प्रकारचे योजनेतून वार्षीक सरासरी ९ ते १०% उत्पन्न प्राप्त होते, या प्रकारचे योजनेत सुरक्षीततेला जास्त प्राधान्य दिले जाते.

 

To Invest online in Reliance Small Cap Fund Please Click here

 

रिलायन्स स्मॉल कँप फंड योजनेत गुंतवणूक करण्यासाठी फॉर्म डाऊनलोड करुन घ्यावयाचा असल्यास या सोबत जोडला आहे.

 

AttachmentSize
KIM_Reliance_Small_Cap_Fund.pdf581.13 KB
Small Cap ProductNote.pdf474.25 KB

Invest Online

खालील म्युच्युअल फंडात यापुर्वी गुंतवणूक केलेल्या व्यक्ती, ज्यांचा फोलीओ नंबर आहे व केवायसी झालेली आहे फक्त अशाच व्यक्ती ऑनलाईन गुंतवणूक करु शकतात, पीन नसली तरी चालेल.
 
 

 



 
 

 

टंकलेखकाची लिपी / भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...