जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार

Online Investment

खालील म्युच्युअल फंडात नवीन व्यक्ती तसेच ज्यानी या पुर्वी  या फंडात गुंतवणूक केलेली आहे अशा कोणत्याही व्यक्ती ऑनलाईन गुंतवणूक करु शकतात.






 

सहभागी व्हा

Who's new

  • गोपाल
  • गुरुदास मोरे
  • संदेश बोरसे

Who's online

There are currently 0 users and 1 guest online.

Forward

KYC

KYC अर्थात ग्राहकाला ओळखून घेणेः

म्युच्युअल फंडात अनैतिक मार्गाने मिळवलेला काळा पैसा गुंतवला जावू नये म्हणून Prevention of Money Laundering Act 2002 अंतर्गत व SEBI चे मार्गदर्शक तत्त्वांनुसार म्युच्युअल फंडाचे कोणतेही योजनेत गुंतवणूक करणा-या व्यक्ती अथवा संस्थला KYC ची पूर्तता करून देणे अनिवार्य आहे. हि प्रतिक्रिया एकदाच करावी लागते व गुंतवणूकदाराला Central Depository Services (India) Ltd. (CDSL) मार्फत एक सर्टिफिकेट प्रदान केले जाते ज्याचा वापर कोणत्याही प्रकारचे गुंतवणुकींसाठी होतो तसेच याची प्रत जोडल्यावर अन्य कागदपत्रे द्यावी लागत नाहीत म्हणून KYC करून घेणे गुंतवणूकदाराचे फायद्याचेच आहे.

वैयक्तिक स्वरूपात व्यक्तिगत KYC ची पूर्तता करून देणेसाठी लागणारी कागद पत्रेः

  • फोटो.
  • ओळखीबाबत पुरावा - पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र, बॅंक पासबुक (फोटो असणारे) यापैकी काहीही एकाची सत्य प्रत.
  • राहणेच्या पत्त्याचा पुरावा - रेशन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, निवडणूक ओळखपत्र, बॅंक पासबुक (फोटो असणारे) यापैकी काहीही एकाची सत्य प्रत.
  • पॅन कार्ड.

संस्थात्मक KYC ची पूर्तता करून देणेसाठी लागणारी कागद पत्रेः

  • पॅन कार्ड. सर्वांनाच आवश्यक, त्याव्यतरिक्त लागणारे कागदपत्रे खालिलप्रमाणेः
  • हिंदू अविभक्त कुटुंबासाठीः
  • डिक्लरेशन डिड
  • बॅक खाते पुस्तक/उतारा नजिकचे कळतील.
  • कंपनी/बॉडी कॉर्पोरेट
  • इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट
  • मेमोरेंडम व आर्टिकल ऑफ असोसिएशन
  • सह्यांचे अधिकार असणारे व्यक्तींची यादी व नमुन्याच्या सह्या

भागिदारी संस्थाः

  • भागिदारी पत्र
  • भागिदारी पत्राचे नोंदणी दाखला
  • गुंतवणूक करण्याबाबतचे अधिकार पत्र
  • सह्यांचे अधिकार असणारे व्यक्तींची यादी व नमुन्याच्या सह्या

ट्रस्ट, फाउंडेशन, एनजीओ, चॅरिटेबल बॉडीज

  • नोंदणी दाखला
  • ट्रस्ट डिड
  • गुंतवणूक करण्याबाबतचे अधिकार पत्र
  • सह्यांचे अधिकार असणारे व्यक्तींची यादी व नमुन्याच्या सह्या

अनइनकॉर्पोरेटड असोसिएशन किंवा बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्सः

  • अस्तित्वाचा दाखला
  • गुंतवणूक करण्याबाबतचे अधिकार पत्र
  • सह्यांचे अधिकार असणारे व्यक्तींची यादी व नमुन्याच्या सह्या

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारः

  • सेबीकडील नोंदणी दाखला व पत्र
  • सह्यांचे अधिकार असणारे व्यक्तींची यादी व नमुन्याच्या सह्या

शेड्युल्ड कमर्शिअल बॅंका व आर्थिक संस्थाः

  • घटना व नोंदणी दाखला
  • गुंतवणूक करण्याबाबतचे अधिकार पत्र
  • सह्यांचे अधिकार असणारे व्यक्तींची यादी व नमुन्याच्या सह्या
  • वरिलप्रमाणे कागदपत्रे पूर्ण भरलेला व सह्या केलेला KYC Form सर्वांसाठी

Invest Online

खालील म्युच्युअल फंडात यापुर्वी गुंतवणूक केलेल्या व्यक्ती, ज्यांचा फोलीओ नंबर आहे व केवायसी झालेली आहे फक्त अशाच व्यक्ती ऑनलाईन गुंतवणूक करु शकतात, पीन नसली तरी चालेल.
 
 

 



 
 

 

टंकलेखकाची लिपी / भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...