जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार

Online Investment

खालील म्युच्युअल फंडात नवीन व्यक्ती तसेच ज्यानी या पुर्वी  या फंडात गुंतवणूक केलेली आहे अशा कोणत्याही व्यक्ती ऑनलाईन गुंतवणूक करु शकतात.






 

सहभागी व्हा

Who's new

  • गोपाल
  • गुरुदास मोरे
  • संदेश बोरसे

Who's online

There are currently 0 users and 1 guest online.

Forward

Systematice Investment Plan (SIP)

Systematic Investment Plan (SIP)म्हणजेच नियमीत केलेली गुंतवणुक:

आपली स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला हा एकच जन्म आहे. गुंतवणुकीचे निर्णय महत्त्वाचे आहेत आहेत कारण आपली स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला त्या निर्णयांचीच मदत होते. Systematice Investment Plan (SIP)म्हणजेच नियमीत केलेली गुंतवणुक प्लँन दरमहा रुपये 500/- इतक्या कमी रकमेने सुरु करता येतो. म्हणूनच हि योजना म्हणजे काही कालावधीत संपत्ती निर्माण कारण्यासाठी तुम्हाला मदत करणारे आर्थिक नियोजनाचे एक सर्वोत्तम साधन आहे.

Systematic Investment Plan (SIP) म्हणजेच नियमीत केलेली गुंतवणुक प्लँन हे एक गुंतवणुक तंत्र असून त्याद्वारे तुमच्या पसंतीच्या म्युचल फंड योजनांमधून लहान लहान रकमा गुंतवून तुम्हाला भविष्यासाठी तरतुद करता येते. या योजनेद्वारे खात्री होते की गुंतवणूकदाराची गुंतवणूक शिस्तबद्ध रीतीने होत राहील आणि त्यामुळे आपली आर्थिक उद्दिष्टे गाठण्यासाठी तो योग्य मार्गावर राहील. शिवाय गु्तवणूकीसाठी आयुष्यात लवकर सुरुवात केल्याने दोन शक्तिशाली गुंतवणूक धोरणांचा लाभ घेता येतो : रुपयाच्या किंमतीची सरासरी आणि चक्रवाढीची शक्ति. त्यामुळे चलनवाढ आणि चढत्या किंमती अशी स्थिती असताना दीर्घकालीन गुंतवणूक क्षितीज तुम्हाला संपत्ती निर्माणासाठी आणि उद्याची तरतुद करण्यासाठी मदतच करील.

SIP चे फायदे:

1) गुंतवणुकीचा शिस्तबद्ध पर्याय.

2) रुपयाचे किंमतीचे सरासरीचा फायदा मिळतो.

3) साधी, सोपी, सोयीची आणि लक्ष ठेवण्यास सुलभ अशी योजना.

4) चक्रवाढीचे लाभ.

एक मात्र लक्षात ठेवा म्युचल फंडात पैसे गुंतवताना दीर्घ काळासाठीच करा. शॉर्ट टर्म मध्ये काहीही होऊ शकते पण दीर्घ मुदतीत फायदाच होतो. दीर्घ मुदत म्हणजे किमान ५ ते १५ वर्ष. सर्वोत्तम पर्याय दरमहा नियमित गुंतवणूक पर्याय निवडणे व पुढील तारखेचे चेक अथवा आटो डेबीट फॉर्म भरून देणे.


Invest Online

खालील म्युच्युअल फंडात यापुर्वी गुंतवणूक केलेल्या व्यक्ती, ज्यांचा फोलीओ नंबर आहे व केवायसी झालेली आहे फक्त अशाच व्यक्ती ऑनलाईन गुंतवणूक करु शकतात, पीन नसली तरी चालेल.
 
 

 



 
 

 

टंकलेखकाची लिपी / भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...