जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार

सहभागी व्हा

Who's new

  • dnyaneshghode
  • d123daddy
  • 15

Who's online

There is currently 1 user and 1 guest online.

Online users

  • चेतन

Google Ads

गुंतवणुक का व कशी करावी?

म्युच्युअल फंडात गुंतवणूक का व कशी करावी?

म्युच्युअल फंडात गुंतवणूक का करावी? उत्तर अगदी सोपं आहे, कारण अतिरिक्त संपत्ती निर्माण करण्यासाठी. फक्त एकच गोष्ट लक्षात असूद्या की, समभाग संबधीत म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करताना ही गुंतवणूक फक्त दीर्घ मुदतीसाठी असावी.   अल्पमुदतीत नफा किंवा नुकसान मोठ्याप्रमाणात होण्याची शक्यता अधिक असते दीर्घ मुदतीत एक तरी नफ्याची चांगली संधी उपलब्ध होण्याची शक्यता अधिक असते. अल्प मुदतीसाठी गुंतवणूक करावयाची असल्यास डेट फंड योजनेत गुंतवणूक करावी.

म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे फायदेः

अत्यल्प खर्च. तज्ञ फंड मॅनेजर्स तुमच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करतात. पारदर्शकता. गुंतवणुकीची किंमत रोजच्या रोज कळते. तरलता - पैसे केव्हाही काढता येतात - ज्यामुळे अपेक्षीत भांडवलवॄद्धी झाली असता किंवा गरज असेल तेव्हा पैसे काढता येतात. देशाच्या ग्रोईंग आर्थिक व्यवस्थात सहभाची संधी. जगाच्या तुलनेत भारतीय अर्थ व्यवस्था वेगाने वाढत आहे. गुंतवणूक अनेक कंपन्यांच्या शेअर्शमध्ये गुंतविली जात असल्यामुळे मर्यादित जोखीम. इक्विटी लिंक सेव्हींग स्कीम मध्ये गुंवणूक करून आयकर कलम ८०-सी खाली मूळ उत्पन्नात वजावट मिळण्याची सुविधा. गुंतवणूक केल्यादिवसापासून एक वर्षानंतर पैसे काढले असता परतावा करमुक्त असतो.

म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे तोटेः

आपले नियंत्रण नसते. नफा किंवा नुकसान शेअर बाजारातील चढउतारावर अवलंबून असते. निश्चित परतावा माहीत नसतो. आता दीर्घ मुदत म्हणजे किती हे व्यक्तीसापेक्ष वेगवेगळे असू शकते. तरी किमान ३ ते १० वर्षे थांबण्याची तयारी असणे सर्वोत्तम म्हणता येईल. नियमित ठरावीक मुदतीने एकाच चांगल्या स्कीम मध्ये गुंतवणूक करितं राहणे फारच उत्तम. ठरावीक मुदत ही शक्यतो दर महा, दर तीन महिन्यांनी अथवा वार्षिक आपल्या सोयीने ठरवता येते. या मध्ये सरासरीचा फायदा मिळतो कारण आपण मार्केट वर असताना तसेच खाली असताना (जेव्हा आपल्या गुंतवणुकीपोटी जास्त युनिट प्राप्त होतात व सरासरी होते). आणखीन एक उत्तम पर्याय म्हणजे ज्याला शक्य असेल त्याने मार्केट प्रत्येक वेळी ३०० ते ५०० पॉंईंटने खाली येते त्या प्रत्येक वेळी गुंतवणूक करावी यामध्ये फारच मोठा फायदा मार्केट मध्ये तेजी आल्यावर होण्याची शक्यता असते.

ULIP अर्थात युनिट लिंक इन्शुरन्स प्लॅन मध्ये अगदी कोणत्याही कंपनीच्या गुंतवणूक करण्या पूर्वी किमान दहा वेळा विचार करा. खरं म्हणजे कोणाच्याही दबावाला अथवा आमिषाला बळी न पडता अजिबात ULIP मध्ये गुंतवणूक करू नका. यात फायदा तुमचा नाही तर तुम्हाला सांगणारे एजंटचा आणि फक्त एजंटाचा आहे. मी स्वतः इन्शुरन्स एजंट असून तुम्हाला हे सांगतो आहे कारण हा अनुभवाचा बोल आहे. तुम्ही जेव्हा ULIP मध्ये पैसे गुंतविता तेव्हा त्यातील २०% ते ६०% पैसे पहिल्या प्रिमियम मध्ये वजा केले जातात व तुमचे फक्त ८० ते ६० टक्के पैसे गुंतवणुकीत जातात. दुस-या वर्षी हेच चार्जेस १% ते १०% असतात तिस-या वर्षापासून १% ते ४% असे चार्जेस असतात. म्युच्युअल फंड हे निव्वळ गुंतवणुकीचे माध्यम आहे व त्यामुळे दि.01-08-2009 पासून सेबीने एंट्री लोड आकारण्यास मनाइ केलेली असल्यामुळे संपूर्ण रक्कम गुंतवणुकिला जाते.  इन्शुरन्सचा खरा उद्देश हा गुंतव़णूक अथवा भविष्याची तरतूद हा नसून जर आपला अकाली मॄत्यु झाला तर आपल्या मागे जिवंत राहणारे व्यक्तींना जगण्यासाठी अडचण येऊ नये हाच आहे. हा म्हणून इन्शुरन्स आवश्यक आहे त्यासाठी टर्म इन्शुरन्स आहेना मग तो घ्या आणि इंनव्हेस्टमेंट अन्यत्र करा.  तुम्हाला या बाबत काही शंका असतील तर  मला संपर्क साधा.


आमचे मार्फत गुंतवणूक करण्यासाठी येथे टिचकी मारा