जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार

सहभागी व्हा

Who's new

  • dnyaneshghode
  • d123daddy
  • 15

Who's online

There are currently 0 users and 1 guest online.

Google Ads

एक रकमी गुंतवणुकीचे फायदे तोटे

एकरकमी गुंतवणूक उदाहरण:

उदाहरण 1) ज्यानी डिसेंबर 1995 मध्ये अशा प्रकारचे योजनेत एक रकमी रुपये एक लाख गुंतवले होते व त्यानंतर त्यानी परत गुंतवणूकही केली नाही अथवा पैसे मध्येच काढलेही नाहीत त्यांचे  १५ ऑगस्ट, २०१० रोजी मुल्य झाले होते रु.४६,४३,३४२/-. 

उदाहरण 2) ज्यानी 1 जानेवारी 2008 रोजी अशा प्रकारचे योजनेत एक रकमी रुपये एक लाख गुंतवले होते व त्यानंतर त्यानी परत गुंतवणूकही केली नाही अथवा पैसे मध्येच काढलेही नाहीत त्यांचे  १५ ऑगस्ट, २०१० रोजी मुल्य झाले होते रु.१,००,९७८/-

 एकरकमी गुंवणूक कोणी करावी?

ज्याचेकडे सद्दस्थीतीत एकदाच एकरकमी गुंतवणूक करण्याची क्षमता आहे. अचानक धनलाभ झाला असता अतिरिक्त असणारी रक्कम दीर्घ मुदतीसाठी गुंतवावी. मात्र अशी गुंतवणूकीत बाजाराची जोखीम जास्त येते, यास्तव अशी गुंतवणूक करताना जी रक्कम आपणाला पुढील किमान 5 वर्षे तरी लागणार नाही एवढीच रक्कम गुंतवावी.  चांगला व अपेक्षी फायदा झाला झाला असता जास्त मोहाला बळी न पडता रक्कम काढून घ्यावी अथवा 15 ते 20 वर्ष विसरुन जाता आले पाहिजे.

एक रकमी गुंतवणूक करताना खालील पर्य़ायाचा विचार अवश्य करा जेणे करुन मुद्दल तर सुरक्षीत राहील व मुद्दलावर मिळणा-या परताव्यासंबधीत गुंतवणूकी परतीच शेअर बाजाराची जोखिम राहील. (खालील पैकी डिव्हीडंड ट्रान्सफर योजना हा पर्याय निवडून मासीक उत्पन्न योजनेत गुंतवणूक करावी).

मासीक उत्पन्न योजना (Monthly Income Plan - MIP)

ज्यांना दरमहा करमुक्त उत्पन्न हवे आहे त्यांनी या प्रकारचे डेट फंड योजनेत गुंतवणूक करावी.  या योजनेत सर्वसाधारणपणे 80% गुंतवणूक हि निश्चित उत्पन्न देणा-या गुंतवणूक प्रकारात जसे कि सरकारी कर्ज रोखे, कंपन्यांचे कर्ज रोखे, मनी मार्केट इ. प्रकारचे पेपर्समध्ये केली जाते, ज्याची मुदत 1 ते 7 वर्षे असते असेच पेपर्स गुंतवणूकीसाठी निवडले जातात, जेणेकरुन व्याजदराचे बदलाचा कमीत-कमी परिणाम होतो.  उर्वरीत 20% रक्कम हि समभाग व समभाग संबंधीत गुंतवणूक प्रकारात केली जाते.  या योजनेत गुंतवणूकदाराला गुंतवणूकीचे तिन पर्याय असतात:

1)      वृध्दी पर्याय: या पर्यायात गुंतवणूकीचे मुल्य बदलत जाते (शक्यातो वाढत जाते).  रक्कम हवी तेव्हा काढता येते.  यातून एक वर्षाचे आत रक्कम काढल्यास 0.25% ते 0.75% एवढा निर्गमन आकार आकारला जातो.  एक वर्षानंतर रक्कम काढल्यास संपुर्ण रक्कम दिली जाते. या योजेत ज्याना कमीतकमी जोखिम व चांगले व करमुक्त उत्पन्न हवे आहे अशानी गुंतवणूकीसाठी हा पर्याय निवडावा.  एका चांगल्या योजनेत मिळालेला परतावा:

मुदत                                                परतावा

मागिल 1 वर्षात                                      27%

मागिल 3 वर्षात वार्षीक सरासरी                      12.50%

मागिल 5 वर्षात वार्षीक सरासरी                      13%


2)      डिव्हीडंड पेआऊट पर्याय: यामध्ये परत दोन प्रकार आहेत:

अ)   मासिक डिव्हीडंड - हा पर्याय स्विकारला असता दरमहा डिव्हीडंड दिला जातो.  अशा प्रकारचे एका चांगल्या योजनेने गेले 5 वर्षे दर महा सरासरी 1.10%.  प्रतीमहा मिळणारा डिव्हीडंड हा कमी जास्त होतो मात्र सरासरी वार्षीक 13% पडलेली आहे.  मिळणारा डिव्हीडंड हा करमुक्त असतो.

आ) तिमाही डिव्हिडंड पर्याय- हा पर्याय स्विकारल्यास दर तिन महिन्यांनी डिव्हिडंड दिला जातो व तो सरासरी तिन महिन्याला 3 ते 3.25% एवढा मिळतो.  वार्षीक सरासरी 14% पडलेली आहे. मिळणारा डिव्हीडंड हा करमुक्त असतो.

3)      डिव्हीडंड पुर्नगुंतवणूक योजना: या योजनेत जाहिर होणारा डिव्हीडंड हा पुन: याच योजनेत गुंतवला जातो व यातील परतावा हा करमुक्त असतो.

4)      डिव्हीडंड ट्रान्सफर योजना: योजनेत जाहिर होणारा डिव्हीडंड हा समभाग संबधीत योजनेत वर्ग केला जातो.  ज्या व्यक्तीना आपले मुद्दल पर्णत: सुरक्षीत रहावे व त्याचबरोबर शेअर बाजाराची थोडी जोखिम स्विकारुन आपले भांडवलात आकर्षक वृध्दी व्हाही असे वाटते त्यांचे साठी हा पर्याय सर्वोत्तम आहे.  यातील गुंतवलेली रक्कम हि डेट फंडात रहात असल्यामुळे गुंतवलेली मुळ रक्कम हि 99% सुरक्षीत रहाते व मिळणारा डिव्हिडंड फक्त शेअर बाजारात गुंतवला जातो ज्याचे मुल्यात शेअर बाजाराचे चढ उताराप्रमाणे वाढ अथवा घट होते मात्र निश्चितपणे काही ना काही तरी उत्पन्न मिळते.  ज्या व्यक्ती एकदाच एक ठरावीक रक्कम गुंतवून हा पर्याय दिर्घ मुदतीसाठी निवडतात त्याना एसआयपी प्रमाणे उत्तम परतावा मिळाला आहे.