जीवनभरासाठी तुमच्याच बरोबर विश्वसनीय भागीदार

सहभागी व्हा

Who's new

  • राजीव1974
  • GuertypeRep
  • Vp82

Who's online

There are currently 0 users and 2 guests online.

Google Ads

गुंतवणुकिचे व्यवस्थापन

गुंतवणुकीचे व्यवस्थापनः

तसं पाहिले असता म्युच्युअल फंडाचे फंड मॅनेजर्स हे आपल्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करतच असतात त्यामुळे आपल्याला काही वेगळे व्यवस्थापन करण्याची गरज नसते. मात्र म्युच्युअल फंडाचे फंड मॅनेजर्सवरती योजनेच्या उद्दिष्टांचे बंधन असते व एका मर्यादेबाहेर त्यांना खरेदी-विक्री करता येत नाही आणि म्हणूनच मार्केट जेव्हा मोठ्या प्रमाणात कोसळते तेव्हा NAV सुद्धा कमी होते. वर्ष २००८ मध्ये शेअर बाजार २१ हजार ते ७५०० पर्यंत कोसळला होता मात्र तो तसा एकाच दिवशी कोसळला नव्हता तर तो टप्या टप्प्याने खाली आला होता. आपल्याला त्यामागचे जागतिक मंदी, अमेरिकेत झालेला सबप्रईमचा घोटाळा, परदेशात दिवाळखोरित निघालेल्या अनेक आर्थिक संस्था इ. कारणे ज्यावेळी आपल्याला समजली त्यावेळी ज्यांनी आपली गुंतवणूक निष्क्रियपणे पाहत न बसता एक तर काढून घेतली अथवा म्युच्युअल फंडचे डेब्टस फंडात वर्ग केली व मार्केट जसं जसं खाली येत गेले त्या त्या वेळी पुनःर्गुंतवणूक केली अथवा डेब्टस फंडातून इक्विटी फंडात वर्ग केली त्यांना मात्र फायदाच झाला.

वर्ष २००८ मध्ये शेअर बाजारात ५ वेळा २०% किंवा अधिकची रॅली म्हणजे चढ उतार झाले, ज्यांनी त्यावेळी वरील पर्यायाचा वापर केला ते बचावले एवढेच नव्हे तर त्यांना चांगला फायदाच झाला. आम्ही आमच्या गुंतवणूकदाराना या बदलाची वेळो वेळी प्रत्यक्ष, टेलिफोनद्वारे अथवा ईमेल करून कल्पना देत होतो त्यामुळे ज्यांनी त्याची अंमलबजावणी केली त्यांना उपयोग झाला. आम्ही फक्त मेजर बदलांचीच दखल घेतो कारण छोटे मोठे चढ उतार हे शेअर बाजारात होतच असतात त्याचेकडे रुटीन समजून प्रत्येकानेच दुर्लक्ष केले पाहिजे. तुमच्यापैकी जे कोणी आमचे मार्फत गुंतवणूक करतील त्यांनाही आमचे कडून आवश्यक तेव्हा आम्हाला अगोदर अंदाज आला किंवा ज्या गोष्टीमुळे बाजारावर परिणाम होवू शकेल अशी कोणतीही गोष्ट वेळीच आम्हाला समजली तर ती तशी तुम्हालाही कळविली जाईला. त्यानंतरचा निर्णय हा सर्वस्वी तुमचाच असेल व होणारे परिणामांनाही तुम्हीच जबाबदार असाल कारण शेअर बाजाराबद्दल कोणाचेच भाकीत १००% बरोबर येत नसतं.


आमचे मार्फत गुंतवणूक करण्यासाठी येथे टिचकी मारा