श्री ठाकूर फिनसर्व्ह प्रायव्हेट लिमिटेड

श्री ठाकूर फिनसर्व्ह प्रायव्हेट लिमिटेड मध्ये आम्ही प्रथम गुंतवणूकदारांशी प्रत्यक्ष अथवा फोनवर चर्चा करून त्यांची जोखीम स्विकारण्याची तयारी, ते कोणत्या कारणासाठी गुंतवणूक करू इच्छितात, किती काळासाठी गुंतवणूक करू इच्छितात याची चर्चा करतो. तसेच म्युच्युअल फंडातील योजना या बाजारातिल जोखीमिशी निगडित असल्यामुळे त्यात असणाऱ्या जोखीमीची व मिळणाऱ्या फायदाची संपूर्ण माहिती देतो. यानंतर ग्राहकाच्या उदिष्ठांनुसार त्यांचेसाठी गुंतवणुकीचे विविध पर्याय त्यांचीबरोबर चर्चा करून गुणतुवणूकदाराला योग्य योजना निवडण्यासाठी मदत करतो त्याप्रमाणे संरचीत पोर्टफोलिओ बनवतो त्यातील फायदे तोटे यांची माहिती परत करून देतो आणि त्यानंतर गुंतवणुकीसाठी मार्गदर्शन करून गुंतवणूक करण्यासाठी मदत करतो

हे करत असताना श्री ठाकूर फिनसर्व्ह प्रायव्हेट लिमिटेड मध्ये आम्ही पूर्वग्रह विरहित ग्राहकाला फायदेशीर होईल याचप्रकारे वेगवेगळी गुंतवणूक साधने निवडण्यास मदत करतो. त्यासोबतच हे नियोजन करत असताना पुढील गोष्टींचाही विचार करतो ज्या तुमच्या जीवनाशी निगडित असतात जसे कि, टर्म इन्शुरन्स, आरोग्य विमा, तातडीच्या आर्थिक गरजेचे नियोजन करणे, मुलांच्या शिक्षणासाठी तरतूद करणे, निवृत्ती नंतरच्या जीवनासाठी आर्थिक तरतूद करणे, याचबरोबर अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या उदिष्ठांची पूर्तता वेळच्यावेळी होण्यासाठी त्याप्रमाणेच गुंतवणूक साधनांची निवड करण्यास मदत करतो. यासाठी आम्ही म्युच्युअल फंडाच्या विविध प्रकारचं समभाग व कर्जरोखे आधारित योजनांची तसेच योग्य मुदतीची बँक किंवा कंपनी एफडीची निवड करण्यासाठी मदत करतो.

इतिहास

Thakur Financial Services या नावाने आर्थिक सेवा देणारा व्यवसाय १ जानेवारी २००० रोजी सुरु करण्यात आला आणि दिनांक 11 मार्च 2025 रोजी श्री ठाकूर फिनसर्व्ह प्रायव्हेट लिमिटेड ची स्थापना कंपनी कायद्या अंतर्गत करणायात आली.

  • • आमच्याकडे सर्व म्युच्युअल फंड योजना
  • • HDFC Life चा जीवन विमा उत्पादने – आम्ही प्रामुख्याने टर्म इन्शुरन्सची शिफारस करतो.
  • • स्टार हेल्थ इन्शुरन्सचा आरोग्य विमा
  • • ICICI चा Three in Account – यात मिळते आरडी/एसआयपी, बँकेचे बचत खाते व डीमॅट खाते आणि शेअर खरेदी-विक्रीसाठी ट्रेडिंग खाते.

आमची टीम

1

श्री. सदानंद ठाकूर

सदानंद ठाकूर हे १९७८ बॅचचे कॉमर्स पदवीधर असून जानेवारी २००० मध्ये ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस या नावाने विविध प्रकारच्या आर्थिक सेवा देणारा व्यवसाय सुरु केला. त्यापूर्वी ते सेल्स टॅक्सची प्रॅक्टिस करत होते. श्री सदानंद ठाकूर यांनी “म्युच्युअल फंड - संपत्ती निर्माण करण्याचा राजमार्ग” हे म्युच्युअल फंडाची माहिती देणारे पुस्तक स्वप्रकाशित केलेले असून त्याचा फायदा अनेक व्यक्तींना झालेला आहे. सदानंद ठाकूर याना शेअर बाजाराचा २० वर्षांपेक्षा जास्त काळाचा अनुभव आहे. श्री ठाकूर फिनसर्व्ह प्रायव्हेट लिमिटेड ते भागधारक (Shareholder) असून Director चेअरमन आहेत.

2

श्री. सुजय ठाकूर

बीकॉम. आणि एमबीए (फायनान्स) यांनी १० वर्षे ऍक्सिस बँक व कोटक बँकेत व्यवस्थापकीय पदावर काम केल्यानंतर ३ ऑक्टोबर २०१८ रोजी ठाकूर फायनान्शिअल सर्व्हिसेस मध्ये सामील झालेले आहेत. श्री ठाकूर फिनसर्व्ह प्रायव्हेट लिमिटेड ते भागधारक (Shareholder) असून Managing Director आहेत.

3

श्री. प्रथमेश उदय शेंडे

बँकिंग आणि म्युच्युअल फंड क्षेत्रात १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले संचालक. ते पुणे विद्यापीठातून वाणिज्य पदवीधर आहेत आणि त्यांनी जोखीम व्यवस्थापन (म्युच्युअल फंड आणि विमा) मध्ये IPGDM चा अभ्यास केला आहे. श्री ठाकूर फिनसर्व्ह प्रायव्हेट लिमिटेड ते भागधारक (Shareholder) असून Director आहेत.

4

सौ. शिवानी सुजय ठाकूर

संचालक आणि कंपनी सचिव.

5

सौ. माधुरी सदानंद ठाकूर

संचालक.

आमचा दृष्टिकोन

तुमच्या विशिष्ट गरजा आणि जोखीम पातळी पूर्ण करणारे पोर्टफोलिओ उपाय प्रदान करण्यासाठी आम्ही एक संरचित आणि शिस्तबद्ध गुंतवणूक दृष्टिकोन वापरतो. आमच्या व्यापक उपायांमध्ये मालकी आणि गैर-मालकीची उत्पादने समाविष्ट आहेत, जी आमच्या सल्लागार सेवांना पूरक म्हणून काळजीपूर्वक निवडली जातात. तुमच्या मालमत्ता वाटपाला अनुकूल असलेल्या निष्पक्ष उत्पादन उपायांची शिफारस करण्यासाठी आम्ही बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व पर्यायांचे मूल्यांकन करतो.

आमचे ध्येय आणि दृष्टी

आमचे ध्येय

आमच्या क्लायंटसाठी एक विश्वासार्ह भागीदार बनणे, वाढ आणि यश मिळवून देणारे नाविन्यपूर्ण उपाय आणि अपवादात्मक सेवा प्रदान करणे.

आमची दृष्टी

आमच्या उद्योगातील एक आघाडीची कंपनी बनणे, उत्कृष्टता, ग्राहक समाधान आणि शाश्वत विकासासाठी आमच्या वचनबद्धतेसाठी ओळखले जाणे.

श्री ठाकूर फिनसर्व्ह प्रायव्हेट लिमिटेडमध्ये, आम्ही तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यास मदत करण्यासाठी समर्पित आहोत. चला एक उज्ज्वल आर्थिक भविष्य घडविण्यासाठी एकत्र काम करूया!

आमच्या उपलब्ध सेवा

आर्थिक नियोजन

आर्थिक नियोजन

म्युच्युअल फंड

म्युच्युअल फंड

फिक्स्ड डिपॉझिट

फिक्स्ड डिपॉझिट

इक्विटी ट्रेडिंग

इक्विटी ट्रेडिंग

गुंतवणुकीचे तत्वज्ञान

प्रामुख्याने आम्ही म्युच्युअल फंडाच्या नियमितपणे उत्तम कामगिरी करणाऱ्या योजनांचे वितरण करतो, जीवन विमा व आरोग्य विम्याच्या माध्यमातून भविष्य सुरक्षित करतो. शेअर बाजारातून पैसे मिळवण्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता असते  वेळ, शेअरबाजाराचा अभ्यास आणि आपल्या निर्णयाची खात्री. या तीन गोष्टी ज्याच्याकडे असतात त्याला निश्चितपणे शेअरबाजारातून फायदा मिळतो आणि ज्यांच्याकडे या तीन गोष्टींचा अभाव असतो त्यांना निश्चितपणे नुकसान होते. म्हणूनच शेअरबाजारातून फक्त १०% लोकांना फायदा व बाकीच्यांना नुकसान होत असते. म्हणूनच जर तुमच्याकडे यातील कोणतीही एक गोष्ट नसेल तर तुम्ही म्युच्युअल फंदातच गुंतवणूक करणे तुमच्या फायद्याचे होते. कारण म्युच्युअल फंडाची कोणतीही योजनेच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन एक तज्ञ फंड मॅनेजर करत असतो.  तो पूर्ण वेळ हेच काम करत असल्यामुळे त्याच्याकडे पुरेसा वेळ असतो. तो उच्च शिक्षित असतो व त्याने शेअरबाजाराचा पूर्ण अभ्यास केलेला असतो, आणि तो सततच अभ्यास करत असतो म्हणून त्याला या विषयाचे आवश्यक ते ज्ञान असते. आणि तो जे गुंतवणुकीचे निर्णय घेतो त्याबाबत त्याची पूर्णपणे खात्री झालेली असते.  आणि म्हणूनच दीर्घ मुदतीत म्युच्युअल फंडाच्या योजनेतून उत्तम परतावा मिळालेला आहे. बाजाराची जोखीम हि अल्पकालीन असते व फायदा हा दीर्घ काळात होतोच. म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यावर जो व्यक्ती श्री साई बाबांच्या एका वाचनावर विश्वास ठेवेल त्याला निशचितच चांगला फायदा होतो व होईल.  येथे नशीब वगैरे काही लागत नाही. पाहिजे फक्त विश्वास “श्रद्धा और सबुरी” या वाचनावर.

नोंदणीकृत पत्ता

301, श्री संस्कृती,
रावतळे, मराठी शाळेजवळ,
चिपळूण, रत्नागिरी - 415605

पत्ता

पहिला मजला, माऊली अपार्टमेंट,
भोगले, पाटणकर रुग्णालयाजवळ,
चिपळूण, रत्नागिरी - 415605

आम्हाला कॉल करा

+91 9823049634

+91 9080659833

+91 7020659833

संपर्क करा

admin@thakurfinserv.com

• ब्रोकरेज पडिस्क्लोजर (इक्विटी, हायब्रिड आणि निवृत्ती योजना वार्षिक ०.१०% ते १.५०% पर्यंत आणि कर्ज योजना वार्षिक ०.०५% ते ०.६०% पर्यंत एएमसी मासिक आधारावर भरतात)

• श्री ठाकूर फिनसर्व्ह प्रायव्हेट लिमिटेड AMFI नोंदणीकृत म्युच्युअल फंड वितरक आणि AMFI नोंदणीकृत PMS वितरक आहेत आणि आम्ही AMFI, AMPI आणि SEBI सर्व नियम आणि कायदे पाळतो.

गोपनीयता धोरण (Privacy Policy) | अस्वीकरण (Disclaimer)

© 2026 Shri Thakur Finserv Pvt. Ltd. – सर्व हक्क राखीव. | All Rights Reserved.