
विमा
जीवन विमा
जीवन विमा म्हणजे काय?
जीवन विमा म्हणजे तुमच्या पश्चात तुमच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींना नियमित उत्पन्न व आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याची व्यवस्था.
विमा नाही किंवा योजना निवडण्यासाठी मार्गदर्शन हवे आहे ?
फक्त खालील फॉर्म भरा आणि आमच्याशी संपर्क साधा
जीवन विमा का आवश्यक आहे?
कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी
जर अचानक काही अनिष्ट घडले, तर तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाचे दैनंदिन जीवन सुरळीत चालावे यासाठी जीवन विमा अत्यंत आवश्यक आहे. तो कुटुंबाला आर्थिक स्थैर्य आणि मानसिक आधार देतो.
अचानक होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून संरक्षण
अपघात, आजारपण किंवा अकाली मृत्यूमुळे उत्पन्न बंद होऊ शकते.जीवन विमा अशा वेळी आर्थिक नुकसान भरून काढण्यास मदत करतो
मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये म्हणून
मुलांचे शिक्षण, फी, करिअरची स्वप्ने कोणत्याही परिस्थितीत थांबू नयेत.योग्य जीवन विम्यामुळे शिक्षणासाठी आवश्यक निधी सुरक्षित राहतो.
वारसांना कोणावर अवलंबून राहावे लागू नये म्हणून
तुमच्या पश्चात कुटुंबातील सदस्यांना कोणाकडे हात पसरावा लागू नये.जीवन विमा त्यांना स्वाभिमानाने आणि आत्मनिर्भरपणे जगण्याची संधी देतो.
कोणता विमा घ्यावा?
टर्म इन्शुरन्स (शिफारसीय)
कमी प्रीमियम
अत्यल्प वार्षिक हप्त्यात मोठे विमा संरक्षण मिळते.सामान्य उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीसाठीही परवडणारा पर्याय.
जास्तीत जास्त विमा संरक्षण
तुमच्या पश्चात कुटुंबाच्या सर्व आर्थिक गरजा भागवण्यासाठी पुरेसा निधी मिळतो. उत्पन्नाची जागा भरून काढण्यास मदत होते
सरळ आणि पारदर्शक विमा
कोणताही गुंतवणूक गोंधळ नाही, फक्त शुद्ध सुरक्षा.विमा म्हणजे नेमके काय हवे आहे ते स्पष्टपणे पूर्ण होते.
पारंपरिक विमा योजना (शिफारस नाही)
कमी विमा संरक्षण
तुम्ही भरलेल्या प्रीमियमच्या तुलनेत विमा संरक्षण खूपच कमी मिळते.आपत्कालीन परिस्थितीत ही रक्कम कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी अपुरी ठरते.
साधारण 4% परतावा
या योजनांमधील परतावा महागाईपेक्षा कमी असतो. त्यामुळे दीर्घकाळात पैशांची खरी किंमत कमी होत जाते.
गुंतवणूक + विमा = गोंधळ
विमा आणि गुंतवणूक एकत्र केल्यामुळे दोन्हींचा उद्देश योग्यरित्या साध्य होत नाही.