
विमा
जीवन विमा
मोटार इन्शुरन्स म्हणजे काय?
मोटार इन्शुरन्समुळे अपघात, चोरी, आग, पूर, भूकंप यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई विमा कंपनीकडून मिळते. हा विमा वाहनधारकाबरोबरच वाहनातील प्रवाशांनाही संरक्षण देतो.
विमा नाही किंवा योजना निवडण्यासाठी मार्गदर्शन हवे आहे ?
फक्त खालील फॉर्म भरा आणि आमच्याशी संपर्क साधा
मोटार इन्शुरन्स का आवश्यक आहे?
अपघात वाढत आहेत
दरमहा लाखो अपघात, खराब रस्ते व वाढती वाहने
कायद्याने बंधनकारक
मोटार वाहन कायदा 1988 नुसार विमा आवश्यक आहे
प्रवाशांचे संरक्षण
तुमच्यासोबत प्रवास करणाऱ्यांनाही कवच मिळते
काय कव्हर होते / काय कव्हर होत नाही?
काय कव्हर होत
अपघात
अपघातात तुमच्या वाहनाचे नुकसान झाले असल्यास दुरुस्तीसाठी लागणाऱ्या खर्चाची भरपाई विमा कंपनीकडून केली जाते. यामध्ये धडक, उलटणे किंवा इतर वाहनाशी झालेला अपघात समाविष्ट असतो.
चोरी
जर तुमची गाडी चोरीला गेली किंवा चोरीचा प्रयत्न करताना नुकसान झाले, तर पॉलिसीतील अटींनुसार विमा कंपनी नुकसान भरपाई देते.
आग, पूर, भूकंप (नैसर्गिक आपत्ती)
आग लागणे, पूर येणे, भूकंप, वादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे वाहनाचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळते.
थर्ड पार्टी नुकसान
अपघातात इतर व्यक्तीला शारीरिक इजा, मृत्यू किंवा इतरांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्याची कायदेशीर व आर्थिक भरपाई विमा कंपनी करते. (हे कव्हर कायद्याने बंधनकारक आहे.).
कव्हर होत नाही
नियमित झीज
गाडीच्या नियमित वापरामुळे होणारी झीज, पार्ट्स खराब होणे किंवा जुनाटपणा यासाठी विमा भरपाई मिळत नाही.
दारू पिऊन अपघात
जर वाहन चालक दारू किंवा अमली पदार्थांच्या प्रभावाखाली वाहन चालवत असेल आणि अपघात झाला तर विमा क्लेम नाकारला जातो.
युद्धजन्य परिस्थिती
युद्ध, दंगल, दहशतवाद किंवा अशा स्वरूपाच्या घटनांमुळे झालेल्या नुकसानीस विमा कव्हर मिळत नाही.
मेंटेनन्स खर्च
नियमित सर्व्हिसिंग, ऑइल बदल, टायर बदल किंवा दैनंदिन देखभाल खर्च विम्यात समाविष्ट नसतो.
मोटार इन्शुरन्सचे फायदे
शारीरिक दुखापतीची भरपाई
अपघाती मृत्यू भरपाई
कोर्ट केस खर्चाची भरपाई
गाडी दुरुस्ती खर्च
पगार / उत्पन्न नुकसान भरपाई